News Flash

‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवं वळण

उष्टी हळद संसार रंगवणार की मोडणार?

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या २५व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने पुन्हा एकदा या दोघांचं लग्न करण्याचं घरच्यांनी ठरवलं आहे. यासाठी जय्यत तयारीही सुरु झाली. घरात आनंदाचं वातावरण आहे. एकीकडे या दोघांच्या लग्नाची धामधूम सुरु असताना संजना आणि अनिरुद्धच्या नात्याचाही उलगडा होणार की काय अशी परिस्थीती निर्माण झालीय. या दोघांच्या नात्याबद्दल हळूहळू सर्वांनाच कल्पना येऊ लागली आहे.

हळदी समारंभाच्या कार्यक्रमात तर संजनाच्या बेफाम वागण्यामुळे अरुंधतीच्या मनातही शंका निर्माण होणार आहे. त्यामुळे उष्टी हळद अनिरुद्ध आणि अरुंधतीचा संसार रंगवणार की मोडणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मालिकेचा वाढत जाणारा टीआरपी याच प्रेमाचं प्रतिक आहे. या यशात मालिकेच्या कलाकारांसोबतच, मालिकेचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मंडळी यांचादेखिल महत्त्वाचा वाटा आहे. ‘आई कुठे काय करते’ दररोज सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 1:43 pm

Web Title: new twist in aai kuthe kay karte serial ssv 92
Next Stories
1 “रियाचा अकारण बळी दिला जातोय”; NCBच्या कारवाईला सोनम कपूरचा विरोध
2 ‘सबका टाइम आयेगा’, कंगना रणौतच्या कार्यालयावरील कारवाईनंतर नितेश राणेंचे सूचक टि्वट
3 “..म्हणून सुशांतसोबत मला काम करायचं नव्हतं”; अनुराग कश्यपचे वॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल…
Just Now!
X