News Flash

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत नवं वळण

किर्तीला मिळणार शुभमची खंबीर साथ?

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शिकलेली मुलगी सून म्हणून नको या मताशी ठाम असणाऱ्या जीजी अक्कांसमोर किर्तीच्या शिक्षणाचं सत्य उघड होतं. किर्तीने इतकी मोठी गोष्ट सर्वांपासून लपवली या गोष्टीचा जीजी अक्कांना खूप त्रास होतो आणि त्या किर्तीला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतात.

किर्तीसाठी हा काळ खूपच कसोटीचा आहे. आई-वडिलांचं छत्र नाही. दादा-वहिनीदेखील कामानिमित्ताने परदेशी गेले आहेत. त्यामुळे किर्ती अतिशय दु:खी आहे. खरंतर तिच्या शिक्षणाविषयी तिने जीजी अक्कांना बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झालं नाही. त्यामुळेच जीजी अक्कांच्या रागाचा किर्तीला सामना करावा लागतो आहे. या परिस्थितीत किर्तिला शुभमची साथ मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. त्यामुळे मालिकेचे यापुढील भाग अतिशय उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असतील.

पाहा फोटो : नथ एक नखरे अनेक…मराठी अभिनेत्रींचा अनमोल दागिना

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका दररोज रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 11:40 am

Web Title: new twist in marathi serial phulala sugandh maticha ssv 92
Next Stories
1 “मम्मी कसम.. हे गाणं पाहून व्हाल वेडे”; राजपाल यादवनं शेअर केला मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ
2 Video : ‘माझी नवरी दिसतेस गं..’; मराठमोळ्या लूकमध्ये कार्तिकी-रोनितचा रोमॅण्टिक अंदाज
3 ‘हीच तुझी खरी ताकद’, NCB अधिकारी असलेल्या पतीसाठी क्रांती रेडकरची खास पोस्ट
Just Now!
X