20 September 2020

News Flash

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

बॉम्ब स्फोटामध्ये किर्ती गमावणार का आई-वडिलांचं छत्र?

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झालेल्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. किर्तीवर तिच्या आई-बाबांचं जीवापाड प्रेम आहे. लेकीने शिकून आयपीएस अधिकारी व्हावं आणि तिचं सुशिक्षित मुलाशी लग्न व्हावं ही स्वप्न आई बाबांनी पाहिली होती. मात्र त्यांची ही स्वप्न फक्त स्वप्नच राहणार का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

किर्तीचे आई बाबा किर्तीला परीक्षा केंद्रावर सोडून खरेदीसाठी मंडईत फिरत असताना अचानक बॉम्ब स्फोट होतो. या बॉम्बस्फोटामध्ये त्यांना मोठी दुखापत होते. एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. शुभम त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये नेतो खरा पण या दोघांचे प्राण वाचणार का हे मालिकेच्या पुढील भागामध्ये उलगडेल.

किर्ती आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडणारा हा प्रसंग आहे. या प्रसंगाचा सामना किर्ती कशी करणार? किर्तीच्या आई-बाबांचा जीव वाचणार का? हे ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील पुढील भागात पाहायला मिळणार आहे. ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 2:41 pm

Web Title: new twist in phulala maticha sugandh marathi serial ssv 92
Next Stories
1 चिरंजीवीचा नवा लूक पाहून चाहते हैराण; कलाकारांनी पाडला कमेंट्सचा पाऊस
2 “साजिद खानने मला विवस्त्र व्हायला सांगितलं”, मॉडेलचा धक्कादायक आरोप
3 सिद्धार्थने खास अंदाजात मितालीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाला…
Just Now!
X