24 October 2020

News Flash

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत नवा ट्विस्ट

गौरीच्या आयुष्यात येणार का नवं वळण?

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गौरी आणि अनिलच्या लग्नासाठी जयदीपने पुढाकार घेतला. शिर्के पाटील कुटुंबात लग्नाची जय्यत तयारीही सुरु झाली आहे. मात्र लग्नाच्या ऐन मुहूर्तावेळी जयदीपच गौरी आणि अनिलचं लग्न मोडतो. असं नेमकं काय घडलं की जयदीपला इतका टोकाचा निर्णय घ्यावा लागला हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

जयदीपच्या या निर्णयाने गौरीच्या आयुष्यात पुढे काय होणार याची उत्सुकता देखिल शिगेला पोहोचली आहे. रविवार १८ ऑक्टोबरच्या महाएपिसोडमध्ये गौरी अनिलच्या लग्नातला मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता हा विशेष भाग प्रेक्षकांना पहायला मिळेल.

आणखी वाचा : ..म्हणून हेमा मालिनीशी लग्न करण्यास गिरीश कर्नाड यांनी दिला होता नकार

गौरी आणि जयदीप अगदी बालपणापासूनचे मित्र. त्यामुळे या लाडक्या मैत्रिणीचं लग्न लावून देण्याची जबाबदारी जयदीपने स्वत:च्या खांद्यावर घेतली. जयदीपवर जीवापाड प्रेम करणाऱ्या गौरीने जयदीपच्या सांगण्यावरुन मनाविरुद्ध जाऊन अनिलसोबत लग्नाला होकार दिला. ज्योतिकासोबत जयदीपचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं आणि त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी गौरीने एवढा मोठा त्याग करण्याचं ठरवलं. मात्र आता जयदीपनेच गौरीचं लग्न मोडण्याचा निर्णय घेतल्याने गौरीच्या आयुष्यात नवं वळण आलं आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या यापुढील भागात या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. १८ ऑक्टोबर रोजी या मालिकेचा महाएपिसोड दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 10:08 am

Web Title: new twist in sukh mhanje nakki kay asta marathi serial ssv 92
Next Stories
1 कुमार सानू यांना करोनाची लागण
2 ..म्हणून हेमा मालिनीशी लग्न करण्यास गिरीश कर्नाड यांनी दिला होता नकार
3 केवळ ‘या’ अटीवर करिनाने बांधली सैफशी लग्नगाठ
Just Now!
X