News Flash

‘स्कॅम 1992’ नंतर आता ‘स्कॅम 2003…’

सोनी लिव्हची नवी घोषणा; भारतातल्या मोठ्या घोटाळ्यावर अजून एक वेबसीरीज

‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरीज कमी वेळात प्रचंड गाजली. 1992 सालच्या भारतातल्या स्टॉक मार्केट घोटाळ्यावर आधारीत ही वेबसीरीज होती. हंसल मेहता यांचं दिग्दर्शन आणि त्याला प्रतिक गांधीसोबत इतर अनेक चांगल्या कलाकारांनी दिलेली साथ, ठेका धरायला लावणारं संगीत यांनी परिपूर्ण असलेल्या या सीरीजला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. यानंतर आता अश्याच अजून एका घोटाळ्यावर नवी वेबसीरीज येणार असल्याची घोषणा सोनी लिव्हने केली आहे.

ही वेबसीरीज ‘स्कॅम 1992’चा सिक्वेल असेल ज्याचं नाव सध्या तरी ‘स्कॅम 2003: द क्युरीयस केस ऑफ अब्दुल करीम तेलगी’ असं असल्याचं कळत आहे. ही नवी वेबसीरीज असणार आहे 2003 च्या स्टँप पेपर घोटाळा प्रकरणावर. या सीरीजसाठी दिग्दर्शन हंसल मेहता यांचंच आहे. ही तेलगी स्टोरी पत्रकार संजय सिंग यांच्या ‘रिपोर्टर की स्टोरी’ या पुस्तकावर आधारीत असणार आहे. संजय यांनीच हा 2003 सालचा घोटाळा समोर आणला होता.

‘स्कॅम 1992’ मध्ये ज्याप्रमाणे हर्षद मेहताचं आयुष्य दाखवलं होतं, त्याप्रमाणे ‘स्कॅम 2003’ मध्ये अब्दुल करीम तेलगी याचं आयुष्य दाखवणार आहे. भारतातल्या मोठ्या घोटाळ्यांपैकी एक घोटाळा करणारा हा तेलगी. या घोटाळ्याचे धागेदोरे भारतातल्या अनेक शहरांमध्ये पसरलेले होते. साधारणपणे 20 हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा होता.

या वेबसीरीजचं लेखन अनेक मराठी चित्रपटांचे लेखक किरण यज्ञोपवित हे करत आहे. पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार संजय सिंग यांच्या मदतीने ही कथा आकार घेत आहे. याच वर्षी या वेबसीरीजचं चित्रीकरण सुरु होणार आहे.

आता ही नवी वेबसीरीज कशी असेल, यात कोणकोणते कलाकार असतील याबद्दल अजून तरी काही माहिती मिळाली नाही. पण एवढं मात्र खरं की, ‘स्कॅम 1992’ मुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा नक्कीच वाढलेल्या असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 1:49 pm

Web Title: new wbseries scam 2003 after the success of scam 1992 by sony liv vsk 98
Next Stories
1 ‘त्याला श्रद्धाशी लग्न करायचे असेल तर…’, रोहन श्रेष्ठाच्या वडिलांचा खुलासा
2 ‘विकास दुबे एन्काऊंटर’ आता मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
3 ‘मॅडम माफ करा’, कविता कौशिकने स्क्रीनशॉट शेअर करताच ट्रोल करणाऱ्याने मागितली माफी
Just Now!
X