26 February 2021

News Flash

‘सनम हॉटलाइन’मध्ये झळकलेली तेजस्वी खताळ नेमकी आहे तरी कोण?

तेजस्वीने प्रियांका चोप्रासोबत 'या' चित्रपटात शेअर केलीये स्क्रीन

कलाविश्वात पदार्पण करावं आणि हक्काचं स्थान मिळावं अशी अनेक तरुण-तरणींची इच्छा असते. त्यामुळे अनेक नवोदित कलाकार दररोज कलाविश्वात त्यांचं नशीब आजमावत असतात. यामध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे प्रचंड मेहनत आणि अभिनयावर असलेलं प्रेम यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडण्यास यशस्वी ठरले. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे तेजस्वी खताळ.

‘काय रे रास्कला’ या चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत स्क्रीन शेअर केल्यानंतर प्रकाशझोतात आलेली तेजस्वी लवकरच ‘सनम हॉटलाइन’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. या सीरिजमध्ये तेजस्वी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून तिच्यासोबत कलाविश्वातील लोकप्रिय कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत.

अनेक मालिका व चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर तेजस्वीने तिचा मोर्चा वेब सीरिजकडे वळवला आहे. आगामी ‘सनम हॉटलाइन’ या सीरिजमध्ये तेजस्वी एका बोल्ड आणि नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

“महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यापासून माझं आणि अभिनयाचं नातं घट्ट आहे. खरं तर माझ्या सगळ्या यशाचं श्रेय मी माझ्या कुटुंबीयांना देते. ते कायम माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. सपोर्ट केला. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी या सीरिजमध्ये काम करु शकले. या सीरिजमधील भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती. त्यामुळे मी लगेच या सीरिजमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला”, असं तेजस्वी म्हणाली.

दरम्यान, तेजस्वीची ‘सनम हॉटलाइन’ ही पहिलीच वेब सीरिज आहे. यापूर्वी तिने ‘ओढ’, ‘खुलता कळी खुलेना’ ,’छोटी सरदारनी, ‘ड्रीम ओव्हर’ अशा अनेक हिंदी, मराठी चित्रपट व मालिकांमध्ये झळकली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 4:37 pm

Web Title: new web series sanam hotline actress tejaswi khatal ssj 93
Next Stories
1  अजितच्या जाळ्यात अडकेल का मंजुळा? सरु आजी नेमकी कोणाची करणार मदत?
2 Then and Now… फोटो शेअर करत हेमा मालिनी यांनी धरम पाजींना दिल्या खास शुभेच्छा
3 ऐश्वर्या- माधुरीचा सेटवर मजामस्ती करतानाचा जुना व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X