25 October 2020

News Flash

WWE चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; गाजलेल्या स्पर्धा पुन्हा होणार प्रक्षेपित

पुन्हा एकदा पाहता येणार WWEच्या क्लासिक फाईट्स

WWE हा स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणून ओळखला जातो. अगदी युरोप अमेरिकेपासून आशिया खंडापर्यंत जवळपास १२२ देशांमध्ये WWE पाहिले जाते. यावरुन आपल्याला त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. मात्र करोना विषाणूमुळे या फाईटिंग शोला देखील मोठा फटका बसला आहे. प्रेक्षकांअभावी त्यांच्या सर्व मोठ्या स्पर्धा रद्द झाल्या आहेत. परंतु तरीही WWEच्या चाहत्यांनी नाराज होण्याची गरज नाही. कारण आता WWEच्या गाजलेल्या स्पर्धा पुन्हा एकदा पाहता येणार आहेत.

WWEने आपलं नवं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये कुठले इव्हेंट्स कधी दाखवणार याबाबत सर्व माहिती त्यांनी दिली आहे.
सोमवारी WWEच्या इतिहासातील गाजलेल्या मॅचेस पाहाता येतील. अगदी रॉक विरुद्ध अंडरटेकर हा सुपरहिट सामना देखील दाखवला जाणार आहे.

  • मंगळवारी WWE रॉचे भाग दाखवले जातील.
  • बुधवारी WWEच्या क्लासिक मॅचेस दाखवल्या जातील. अगदी सुरुवातीच्या काळात कशा प्रकारच्या स्पर्धा खेळल्या जात होत्या हे देखील दाखवले जाणार आहे.
  • गुरुवारी WWE NXT दाखवले जाणार आहे.
  • शुक्रवारी WWEवर तयार करण्यात आलेल्या डॉक्युमेट्री दाखवल्या जातील.
  • शनिवारी स्मॅकडाऊनचे जुने भाग दाखवले जातील.
  • रविवारी रॉक, अंडरटेकर, ब्रॉक लेसनर यांसारख्या सुपरस्टार खेळाडूंच्या अविस्मरणीय मॅचेस दाखवल्या जातील.

करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पुर्ववत होईपर्यंत हे सर्व इव्हेंट ‘सोनी टेन 1’ आणि ‘सोनी टेन 3’ या वाहिन्यांवर रोज रात्री आठ वाजदा दाखवले जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 1:20 pm

Web Title: new wwe program slot launched on sony network mppg 94
Next Stories
1 ‘बिग बॉस’, ‘रोडीज’ पाहणाऱ्यांना आता देवाची आठवण; ‘रामायण’ मालिकेवर कविता कौशिकचं ट्विट
2 ‘ब्लॅक विडो’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3 ‘दर महिन्याचं गणित जमवताना पोटात धडधडतंच आहे’; स्पृहा जोशीची पोस्ट
Just Now!
X