02 March 2021

News Flash

‘रुचिका कपूर आणि तिच्या कुटुंबीयांचा…’, शाहीर शेखने केला लग्नाबाबत खुलासा

त्याने एका मुलाखतीमध्ये केला खुलासा..

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शाहीर शेखने काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड रुचिका कपूरशी लग्न केले. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांनी कोर्टात लग्नात केले. त्यावेळी त्यांनी केवळ जवळच्या १० लोकांना आमंत्रण दिले होते. शाहीरने आणि रुचिकाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकताच एका मुलाखतीमध्ये शाहीरने लग्नाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहे.

शाहीरने स्पॉटबॉयला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने पत्नी रुचिका कपूर आणि तिच्या कुटुंबीयांचा कोर्टात लग्न करण्यास नकार असल्याचे म्हटले आहे. ‘मला माझा वाढदिवस देखील साजरा करायला आवडत नाही. त्यामुळे मला माझे लग्न एकदम साध्या पद्धतीने करायचे होते. पण रुचिका आणि तिच्या कुटुंबीयांचा नकार होता. त्यामुळे आम्ही जून महिन्यात एक कार्यक्रम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आम्हाला असे लग्न करावे लागले’ असे शाहीर म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ShaheerianR (@shaheerian_r)

पुढे तो म्हणाला, ‘आम्ही अशा पद्धतीने लग्न केल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मी आणि रुचिकाने २०२१च्या जून महिन्यात एक कार्यक्रम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’

गेल्या काही वर्षांपासून शाहीर रुचिकाला डेट करत होता. कोर्टात लग्न केल्यानंतर शाहीर शेखने पत्नी रुचिकासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये शाहीर आणि रुचिकासोबत अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर असल्याचे दिसत होते.

शाहीर हा मुळचा जम्मूचा आहे. लग्नानंतर शाहीर आणि रुचिका जम्मूला रवाना झाले होते. रुचिका ही क्रिएटीव्ह प्रोड्यूसर आहे. तिने ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘लैला मजनू’ या चित्रपटांसाठी निर्माती म्हणून काम केले आहे. तिने ‘मेंटल है क्या’, ‘जबरिया जोड़ी’, ‘डॉली किट्टी’, ‘वो चमके सितार’ आणि ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटात भूमिका साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 3:01 pm

Web Title: newly married shaheer sheikh reveals ruchikaa kapoor and his parents were against a simple wedding avb 95
Next Stories
1 माधुरी दीक्षितने शेअर केला पती आणि मुलांसोबतचा व्हिडीओ, म्हणाली..
2 लता मंगेशकरांनी शेअर केली रेडिओवरील पहिल्या गाण्याची आठवण
3 बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केला बाथरुममधील बोल्ड फोटो
Just Now!
X