इंटरनॅशनल इंडियन फिल्म अ‍ॅकॅडमी अर्थात आयफा या नावाने गेल्या काही दशकापासून बॉलिवूड चित्रपटाचा पुरस्कार सोहळा दरवर्षी निरनिराळ्या देशांमध्ये साजरा केला जातो. २० वर्षांतील यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला आहे. शनिवारपासून (१४ सप्टेंबर) या सोहळ्याच्या पूर्वतयारीला सुरुवात करण्यात येणार आहे.

२०व्या आयफा पुरस्काराच्या पूर्वतयारीला १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत ही रिहर्सल सुरु राहणार आहे. सकाळी ११ ते १२ या एक तासामध्ये बॉलिवूड गायक धवानी भानुशाली,बॅण्ड आणि संजय शेट्टी यांची रंगीत तालीम होणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत गायक तुलसी कुमार, बँण्ड आणि डिंपल डान्सर्स (रॉक) हे सराव करतील. या साऱ्यानंतर दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत अभिनेत्री सारा अली खान तिच्या स्टेज परफॉर्मन्सची प्रॅक्टीस करणार आहे.

 

View this post on Instagram

 

#iifa20 #iifahomecoming #nexaexperience

A post shared by IIFA Awards (@iifa) on


दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी मुंबईतील एनएससीआय, एसव्हीपी स्टेडियम येथे हा आयफा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमामध्ये अभिनेता आयुषमान खुराना आणि अर्जुन कपूर सूत्रसंचालन करणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानदेखील परफॉर्म करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त रणवीर सिंह, विकी कौशल, माधुरी दीक्षित, कतरिना कैफ आणि सारा अली खान यांचेदेखील परफॉर्मन्स असणार आहेत.