News Flash

“लस कुठे उपलब्ध आहे ते सांगा?”; ‘त्या’ सेलिब्रिटींना निया शर्माचा सवाल

सोशल मीडियावरून साधला निशाणा

देशात करोनाचे रुग्ण वाढत असले तरी मोठ्या प्रमाणावर लसीकरण देखील सुरु आहे. देशभरात एकूण १५ कोटी २१ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचं नुकतच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलंय. अशातच अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावरून नागरिकांना लस घेण्याचं आवाहन करत आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये लसीकरण केंद्राबाहेर लागलेल्या मोठ्या रांगाचं चित्र बातम्यांमधून पाहायला मिळतंय. सोशल मीडियावरही लसीकरण केंद्रांबाहेरच्या भल्या मोठ्या रांगांचे फोटो व्हायरल होताना दिसतात. अशात अभिनेत्री निया शर्मानेलसीकरणासाठी लोकांना आवाहन करणाऱ्या सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे.

निया शर्माने एक ट्विट शेअर करत लसीकरणासाठी प्रोत्सहान देणाऱ्या सेलिब्रिटींना एक प्रश्न विचारला आहे. ती म्हणाली, “या देशातील प्रत्येक जागृत सेलिब्रिटी लोकांना लसीकरण करून घेण्याचं आवाहन करत आहे. कृपा करून लस उपलब्ध असलेल्या केंद्रांची नावंदेखील सांगा जेणेकरून दिवसभर रांगेत उभे राहणारे हजारो लोक मूर्खासारखे तरी दिसणार नाहीत. PS आपल्याला लस घेण्याची गरज आहे.”

नियाच्या या ट्विटनंतर अनेक चाहत्यांनी तिच्या या पोस्टला सहमती दर्शवली आहे. एका चाहतीने म्हंटलंय, ” अगदी बरोबर बोललीस निया लोक सकाळपासून रात्रीपर्यंत लस घेण्यासाठी रांगेत उभं राहत आहेत. मात्र अनेक केंद्रांवर तर लसच उपलब्ध नाही. सरकारला नागरिकांची काळजी असेल तर त्यांनी आधी लसीच्या उपलब्धतेची खातरजमा करावी.” असं युजरने म्हंटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 4:34 pm

Web Title: nia sharam criticized celebrity who are appealing for covid vaccine kpw 89
Next Stories
1 सलमानच्या ‘राधे’मध्ये जॅकलिनची एण्ट्री, ‘दिल दे दिया है’ गाणे प्रदर्शित
2 ‘त्या’ मुलांचं शिक्षण मोफत करा; सोनू सूदची सरकारकडे मागणी
3 ‘बिग बॉस’ फेम साहिल आनंदच्या घरी नव्या पाहुण्याचे आगम
Just Now!
X