X
X

निया शर्माचा हा व्हिडिओ का होतोय इतका व्हायरल?

निया तिच्या 'ट्विस्टेड २' या नव्या बेवसिरीजमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा तिच्या बिंधास्त अंदाजासाठी कायमच ओळखली जाते. सध्या छोट्या पडद्यापासून लांब असलेली निया तिच्या ‘ट्विस्टेड २’ या नव्या बेवसिरीजमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. या वेबसिरीजमुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आली असून तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एका विदेशी गाण्यावर थिरकतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

‘खतरों के खिलाडी’ असो किंवा ‘जमाई राजा’ या कार्यक्रमांमध्ये नियाने तिच्या अभिनयाची झलक चाहत्यांना दाखवून दिली आहे. मात्र नियाचा खरा कल नृत्याकडे असल्याचं अनेक वेळा पाहायला मिळालं आहे. नियाने अनेक वेळा सोशल मिडीयावर तिच्या नृत्याचे किंवा नृत्याच्या सरावाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. नियाने नुकताच शेअर केलेला व्हिडिओ सध्या तुफान गाजत असून त्याच्यावर लाखोंच्या संख्येने लाईक्स येत आहेत.

निया सध्या ‘ट्विस्टेड् २’ या वेबसिरीडमध्ये काम करत असून या वेबसिरीजच्या माध्यमातूनच तिने एका विदेशी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून केवळ १४ तासांमध्ये त्याला लाखोंच्या संख्येने व्ह्युज मिळत आहेत.

I also got my fav #magentariddim beats #goldawards2018 @vikaaskalantri

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

डिजे स्नेकच्या Magenta Riddim वर निया थिरकत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून आतापर्यंत त्याला २ लाखापेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. नियाचा डान्स पाहुन चाहत्यांनी तिला रॉकस्टार वैगरे अशी विशेषणे दिली आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना ‘गोल्ड अॅवॉर्ड २०१८’ असं हॅश टॅग वापरत कॅप्शन दिली आहे. याचाच अर्थ ती गोल्ड अॅवॉर्ड्समध्ये सहभाग घेणार असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे.

आशियातील ‘मोस्ट सेक्सी वुमन’ म्हणून नियाची ओळख आहे. नियाने ‘काली’ या मालिकेपासून कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि ‘एक हजारों में मेरी बहना है या मालिकेमुळे ती नावारुपाला आली.

22
Just Now!
X