News Flash

सिग्नलवर चोराने लंपास केली बॅग, अभिनेत्रीने ट्विटरद्वारे पोलिसांकडे मागितली मदत

मुंबई पोलिसांनी दिले उत्तर, म्हणाले..

छोट्या पडद्यावरील अतिशय स्टायलिस्ट आणि कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे निया शर्मा. काही दिवसांपूर्वी वाढदिवसाच्या केकमुळे नियाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. खतरों के खिलाडी मेड इन इंडियाची विजेती असलेली निया सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. या चर्चा गाडीमधून तिची हँडबॅग चोरीला गेल्यामुळे सुरु झाल्या आहेत. नियाने ट्विटरद्वारे मुंबई पोलिसांकडे मदतही मागितली आहे.

मुंबईमधील लोअर परेल परिसरातून नियाच्या कारमधून हँड बॅग चोरीला गेली आहे. नियाने ट्विट करत मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे. ‘लोअर परेल येथील सेनापती बापट मार्गाच्या सिग्नल जवळ कोणीतरी माझ्या कारमधून हँडबॅग चोरली आहे. कृपया माझी मदत करा’ असे तिने म्हटले आहे.

मुंबई पोलिसांनी नियाच्या या ट्विटला उत्तर देखील दिले आहे. ‘तू तुझा नंबर आम्हाला मेसेज कर. आम्ही लवकरच तुला संपर्क करु’ असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटवर नियाने इतक्या तातडीने उत्तर दिल्याबद्दल तुमचे आभार असे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच नियाने तिचा ३० वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण नियाच्या वाढदिवसाच्या केकमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर नियाने एक पोस्ट शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना सुनावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 11:36 am

Web Title: nia sharma hand bag stolen from her car avb 95
Next Stories
1 मौनी रॉयने केला साखरपुडा? वाचा नेमकं काय आहे प्रकरण
2 Video: मलायका अरोराने ‘तारक मेहता’मधील डॉक्टर हाथीसोबत केला डान्स
3 Video : पाहा, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘द व्हाइट टायगर’चा ट्रेलर
Just Now!
X