28 September 2020

News Flash

.. अन् थोडक्यात बचावली निया शर्मा

दिवाळी निमित्त आयोजीत केलेल्या एका पार्टीत नियाने हजेरी लावली.

छोट्या पडद्यावरील ‘जमाई राजा’ या लोकप्रिय मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री निया शर्मा सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. टीव्ही कलाकारांसाठी दिवाळी निमित्त आयोजीत केलेल्या एका पार्टीत नियाने हजेरी लावली. या पार्टिसाठी तिने खास पाढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. परंतु या पोषाखाला अचानक आग लागली.

पार्टिमध्ये डान्स करत असताना जवळच असलेल्या एका दिव्यामुळे नियाच्या ड्रेसला आग लागली. तेवढ्यात कोणा व्यक्तिचे लक्ष त्या आगीकडे गेले. त्याने तिला लगेचच सावध केले. त्यानंतर पाणी टाकून पेटता ड्रेल विझवला गेला. या संपूर्ण प्रकरणात निया शर्मा थोडक्यात बचावली.
“एक लहानसा दिवा खुप मोठे नुकसान करु शकतो.” असे म्हणत नियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. शिवाय तिने आपल्या जळलेल्या ड्रेसचा फोटो देखील शेअर केला आहे. जीवावर बेतलेल्या या संकटानंतरही नियाने पार्टिमध्ये खुप धमाल मस्ती केली.

निया येत्या काळात एकता कपूरच्या नागिन या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेचे चौथे पर्व नियामुळे सध्या चर्चेत आहे. या मालिकेत ती इच्छाधारी नागिनची भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 3:18 pm

Web Title: nia sharma lehenga catches fire at diwali party mppg 94
Next Stories
1 मुलीच्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट घ्यायला मीच मदत करतो – शाहरुख खान
2 शाहरूख का झाला कट्टरतावाद्यांकडून ट्रोल ?
3 सलमानने सहा दिवस आधी ठरलेलं लग्न मोडलं, साजिद नाडियाडवालाने केला खुलासा
Just Now!
X