करोना व्हायसरचा वाढता फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केली. सर्वचजण आपल्या घरात अडकून पडले आहेत. त्यामुळे सध्या अनेक कलाकार मिळालेल्या वेळात जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. अशातच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्माला देखील अनेक गोष्टींची आठवण येत आहे.

नुकताच नियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा बॅकलेस टॉप परिधान केला असून ती या लूकमध्ये अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे.

हा फोटो शेअर करत नियाने तिला क्लबिंग आणि पार्ट्यांची आठवण येत असल्याचे म्हटले आहे. ‘मी आज माझे जुने फोटो पाहिले आणि मला आठवले की मी त्यावेळी बऱ्याच पार्ट्यांना जायचे, क्लबिंग करायचे. मी इतकी नाचायचे की शेवटी कोणी तरी येऊन आम्हाला तेथून निघून जायला सांगयचे’ असे तिने म्हटले आहे.

तिच्या या पोस्टवर नागिन ४मधील को-स्टार विजयेन्द्र कुमेरियाने भन्नाट कमेंट केली आहे. ‘घरात पार्टी करण्याचा प्रयत्न कर… तुझं घर… तुझी पार्टी.. कोणीही तुला तेथून जायला सांगणार नाही’ असे त्याने कमेंटमध्ये म्हटले आहे. त्यावर नियाने मजेशीर अंदाजात रिप्लाय दिला आहे. ‘हो मी एकटी घरी पार्टी करते… भींतीवर डोकं आपटून. पण ३० सेकंदानंतर मला थकायला होतं’ असे तीने उत्तर देत म्हटलं आहे.