News Flash

‘बिकिनी फोटोशूट आधी मी दोन दिवस जेवले नाही’, अभिनेत्रीचा अजब खुलास

तिने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे निया शर्मा. ती सतत तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकतीच नियाची ‘जमाई राजा २.०’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये निया आणि अभिनेता रवी दुबे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. सीरिजमध्ये नियाने अनेक बोल्ड सीन दिले आहेत. तसेच एका सीनमध्ये तिने बिकिनी परिधान केली आहे.

एका मुलाखतीमध्ये नियाने ‘जमाई राजा २.०’ सीरिजमध्ये बिकिनी सीन देण्याबाबत खुलासा केला आहे. ‘मी हा सीन शूट करण्यापूर्वी दोन दिवस जेवले नव्हते. मी खाणं बंद केलं होतं. बिकिनी सीन सीरिजमधील महत्त्वाचा सीन होता. जेव्हा आम्ही चित्रीकरणासाठी समुद्र किनारी गेलो तेव्हा थोडे ढगाळ वातावरण होते. त्यामुळे मी थोडी नरवस झाले होते. त्यानंतर मी काही फोटो क्लिक करुन माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. ते फोटो खूप व्हायरल झाले होते’ असे निया म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

आणखी वाचा : ‘बोल्ड सीन शूट करताना त्याने…’, नियाने सांगितला शुटिंग दरम्यानचा अनुभव

‘जमाई राजा २.०’ ही वेब सीरिज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका जमाई राजाचे डिजिटल रुपांतरण आहे. पण त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहे. या सीरिजमध्ये रवी सिद्धार्थ हे पात्र साकारणार आहे तर निया रोशनी हे पात्र साकारणार आहे. ही सीरिज २६ फेब्रुवारी रोजी झी ५ प्रिमिअम वर प्रदर्शित झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 4:09 pm

Web Title: nia sharma on bikini scene in jamai raja 2 0 avb 95
Next Stories
1 Kangana Ranaut : अभिनेत्री कंगणा रनौतची आता सर्वोच्च न्यायालयात धाव!
2 दिशाने टायगरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, बहिण म्हणाली ‘तुझ्याकडे या पेक्षा…’
3 उर्वशीचा So Preety व्हिडीओ, अदाकारीवर चाहते फिदा
Just Now!
X