News Flash

चित्रीकरणादरम्यान सर्वांसमोर ‘या’ अभिनेत्याने केलं निया शर्माला प्रपोज

निया आणि कमल एका म्युझिकल व्हिडीओचे चित्रकरण करत होते. त्याचवेळी कमलने नियाला प्रपोज केले.

निया आणि कमल एका म्युझिकल व्हिडीओचे चित्रकरण करत होते.

अभिनेत्री निया शर्मा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. निया सतत तिच्या फॅशन आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी एका सह कलाकाराने चित्रीकरणा दरम्यान सगळ्या लोकांसमोर तिला प्रपोज केल्याने निया चर्चेत आली आहे.

निया आणि कमल कुमार हे त्यांच्या एका नवीन म्युझिक व्हिडीओचं चित्रीकरण करत होते. त्यावेळी अचानक कमल कुमारने नियाला प्रपोज केले. नियाला कळलेच नाही की काय बोलू. ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत कमलने या घटने विषयी सांगितले. “आम्ही शॉटची वाट पाहत होतो, प्रत्येकजण स्वत:च्या कामातं होतं. जेव्हा मी नियाला प्रपोज केलं. निया आणि मी दोघेही हसलो तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. ही मस्ती होती. निया खूप सुंदर आहे, प्रत्येकाला तिला प्रपोज करायचं असेल. हे सगळं आम्ही संपूर्ण क्रुच्या मनोरंजनासाठी केलं होतं,” असे कमल म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by kamalkumar (@ikamalkumar)

आणखी वाचा : अभिनेत्री होण्यापूर्वी परिणिती चोप्रा अनुष्का शर्मासाठी करायची हे काम

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

आणखी वाचा : ‘केआरके कुत्ता है’ गाण्यावरुन वाद, कमाल खानने दिली मिका सिंगला धमकी

खऱ्या आयुष्यात नियाचं नाव हे अभिनेता राहुल सुधिरसोबत जोडले जाते. राहुल गेल्यावर्षी नियाच्या भावाच्या वाढदिवसाच्या पार्टित उपस्थित होता. ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत असे ते नेहमीच सांगतात. मात्र, त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे की त्या दोघांनी रिलेशनशिपमध्ये यावे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 3:08 pm

Web Title: nia sharma proposed by her co star kamal kumar says i suddenly went on my knees and proposed to her dcp 98
Next Stories
1 मनोज वाजपेयीची पत्नी शबानावर नाव बदलण्यासाठी टाकण्यात आला होता दबाव
2 ‘पागलपन की हद से ना गुजरे, वो प्यार कैसा?’, तापसीच्या ‘हसीन दिलरुबा’चा ट्रेलर प्रदर्शित
3 Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूतचा रुममेट सिद्धार्थने लग्नासाठी केली जामिनाची मागणी
Just Now!
X