News Flash

‘आनंद विकत घेता येत नाही, पण…’; नियाने केलं नव्या पाहुण्याचं स्वागत

निया शर्माने शेअर केले फोटो

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा साऱ्यांनाच ठावूक असेल. बोल्ड आणि हॉटफोटोशूटमुळे निया कायम चाहत्यांमध्ये चर्चेत येत असते. यात अनेकदा तिच्या पर्सनल लाइफचीदेखील चर्चा रंगत असते. काही दिवसांपूर्वी नियाने नवीन घर खरेदी केलं होतं. त्यानंतर आता नियाने एक नवीन ब्रॅण्ड न्यू कार खरेदी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निया चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे तिची ही कार प्रचंड महाग असल्याचं सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या नियाने तिच्या नव्या कारचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.सोबतच त्याला खास कॅप्शनदेखील दिली आहे. तुम्ही आनंद विकत घेऊ शकत नाही. पण कार नक्कीच घेऊ शकता आणि या हा आनंद समसमानच आहे, असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

वाचा : मराठी चित्रपट निर्माते विक्रम धाकतोडे पोलिसांच्या ताब्यात; अमोल कागणेंची केली फसवणूक

नियाने व्हॉल्वो 90 D5 इंस्क्रिप्शन ही कार खरेदी केली असून या कारची किंमत जवळपास ८७ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. निया छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून लवकरच ती नेहा आणि टोनी कक्करच्या गले लगाना है या गाण्यात झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 12:10 pm

Web Title: nia sharma purchased a brand new volvo car worth around rs 80 lakh ssj 93
Next Stories
1 लता मंगेशकरांवर टीका करणाऱ्याला अदनान सामीने सुनावलं; म्हणाला..
2 Video: व्हिसा न घेताच अभिनेता पोहोचला दुबई अन्…
3 Video : सुदेश लहरींनी केली सूनबाईंची तक्रार; म्हणाले…
Just Now!
X