28 February 2021

News Flash

‘बोल्ड सीन शूट करताना त्याने…’, नियाने सांगितला शुटिंग दरम्यानचा अनुभव

निया लवकरच 'जमाई राजा २.०'मध्ये दिसणार आहे,

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा आणि अभिनेता रवी दुबे यांनी २०१४मध्ये जमाई राजा या मालिकेत एकत्र काम केले होते. त्यावेळी त्यांची ही जोडी हिट ठरली होती. त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता ही जोडी पुन्हा एकदा ‘जमाई राजा २.०’ या सीरिजमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. या सीरिजमध्ये निया अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहे. या सीरिजमध्ये बोल्ड सीन देण्याबाबत नियाने वक्तव्य केले आहे.

निया शर्माने ‘जमाई राजा २.०’ या सीरिजमध्ये अभिनेता रवी दुबेसोबत इंटीमेट सीन दिले आहेत. हे सीन सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या सीन विषयी नियाला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले होते. तेव्हा तिने यावर वक्तव्य केले आहे.

नियाने टाइम्स नाऊला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिचा अनुभव शेअर केला आहे. ‘हो मी सीरिजमध्ये बोल्ड सीन दिले आहेत. रवी एक उत्तम अभिनेता आहे. त्याच्यासोबत चित्रीकरण करताना मला कोणाताही त्रास झाला नाही. मला त्याने कधीही सेटवर किंवा चित्रीकरणादरम्यान अनकम्फर्टेबल वाटू दिले नाही’ असे निया म्हणाली.

काही दिवसांपूर्वीच ‘जमाई राजा २.०’ सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ही वेब सीरिज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका जमाई राजाचे डिजिटल रुपांतरण आहे. पण त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहे. या सीरिजमध्ये रवी सिद्धार्थ हे पात्र साकारणार आहे तर निया रोशनी हे पात्र साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 6:24 pm

Web Title: nia sharma reacts on kissing scenes with ravi dubey in jamai raja 2 avb 95
Next Stories
1 शाहरुखचा मुलगाही ठरतोय किंग; त्याचे फोटो पाहिलेत का?
2 साराने शेअर केला ‘मिस्ट्री मॅन’चा फोटो, म्हणाली ओळखा पाहू…
3 बाप-लेकीची जोडी! कपिल शर्माच्या मुलीला पाहिलेत का?
Just Now!
X