छोट्या पडद्यावरील अतिशय स्टायलिस्ट आणि कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे निया शर्मा. अलिकडेच निया तिच्या बर्थ डे केकमुळे चर्चेत आली होती. तिला अनेकांनी ट्रोल केलं होतं. मात्र, आता निया पुन्हा एकदा तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. नियाने अलिकडेच बिकिनी फोटोशूट केलं आहे.

नियाने सोशल मीडियावर गोव्यामधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती बीचवर असून तिने बिकिनी परिधान केली आहे. तिचा हा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला असून या फोटोला तब्बल ४ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)


दरम्यान, नियाने ‘काली’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. मात्र ‘एक हजारो मैं मेरी बेहेना है’ या मालिकेतून निया घराघरात पोहोचली. त्यानंतर नियाने ‘जमाई राजा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली.