27 February 2021

News Flash

प्रियांकाला मिळणार ऑस्कर?; तिच्या ‘आहों’नीच केली भविष्यवाणी

प्रियांकाने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

देसी गर्ल प्रियांका चोप्राने फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. प्रियांकाच्या अभिनयाबद्दल आता बोलण्याचं कारण म्हणजे अलीकडेच तिचा ‘द व्हाईट टायगर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील प्रियांकाचा अभिनय पाहून जगभरात तिची स्तुती होत आहे. दरम्यान तिचा पती निक जोनासनेही कौतुक केलं आहे. त्याबद्दल प्रियांकाने एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे.

‘व्हरायटी सर्किट पॉडकास्ट अवॉर्ड्स’ मध्ये प्रियांका पती निक जोनासचे कौतुक करत म्हणाली की, “माझा नवरा परिपूर्ण आहे. जो कधीच चूकीच्या गोष्टी करत नाही आणि यामुळेच आम्ही आणखी जवळ येतो. निकमुळे माझा स्वत: वरचा आत्मविश्वास आणखी वाढतो. मला असे वाटते की मी जे काही करत आहे ते बरोबर आहे. निकला माझ्या कामावर खूप विश्वास आहे. तो मला म्हणतो की ऑस्कर जिंकणारी पहिली जोनास तूच असू शकते.”

‘द व्हाईट टायगर’ सोबत प्रियांकाचा ‘वि कॅन बी हिरोज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. लवकरच प्रियांकाला ‘मॅट्रिक्स ४’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 11:44 am

Web Title: nick jonas feels priyanka chopra will become the first jonas family member to win an oscar dcp 98 avb 95
Next Stories
1 Video: लग्नानंतर नताशा आणि वरूण राहणार ‘या’ घरात
2 चित्रपटगृह, नाट्यगृहांना केंद्राचा मोठा दिलासा; ५० टक्के प्रवेशांचं बंधन हटवलं
3 OTT platforms ला लगाम! केंद्र सरकार लवकरच जाहीर करणार नियमावली
Just Now!
X