20 September 2018

News Flash

देसी गर्ल प्रियांका विदेशी मित्र निकसोबत लवकरच येणार भारतात?

निकनं काही महिन्यांपूर्वी भारतात येण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे येत्या काही दिवसांत हे जोडपं भारतात येण्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून हे कथित लव्ह बर्ड अनेकदा एकत्र फिरताना दिसले.

प्रियांका आणि तिचा कथित प्रियकर निक जोनासच्या चर्चा सध्या सगळीकडेच पाहायला मिळत आहेत. दोघांची वाढती जवळीक पाहता नक्की प्रेमप्रकरण सुरु आहे की आणखी काय? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. या दोघांनीही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नसला तरी त्यांनी डेट करत असल्याचं नाकारलंही नाहीये. त्यामुळे या दोघांमध्ये नक्की काय सुरूय हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

HOT DEALS
  • Honor 8 32GB Pearl White
    ₹ 12999 MRP ₹ 30999 -58%
    ₹1500 Cashback
  • Sony Xperia L2 32 GB (Gold)
    ₹ 14845 MRP ₹ 20990 -29%

अबब! ‘भारत’ चित्रपटासाठी प्रियांकानं आकारलंय चक्क एवढ्या कोटींचं मानधन?

गेल्या काही दिवसांपासून हे कथित लव्ह बर्ड अनेकदा एकत्र फिरताना दिसले. इतकंच नाही तर प्रियांकानं निकच्या चुलत बहिणीच्या लग्नसोहळ्यातही उपस्थिती लावली होती. आता प्रियांका आणि निक हे दोघंही येत्या काही दिवसांत भारतात येणार असल्याच्याही नव्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार कदाचित पुढच्या काही दिवसांत प्रियांका कथित प्रियकर निकसोबत भारतात येणार आहे.

प्रियांकाच्या हँडबॅगची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल !

काही दिवसांपूर्वी निकनं आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत भारतात येण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मी प्रियांकाकडून भारताबद्दल खूप ऐकलं होतं. माझ्या नवीन मित्र- मैत्रिणींनीही भारताचं खूप कौतुक केलं होतं म्हणूनच भारतात येण्यासाठी मी खूप उत्सुक असल्याचं निक म्हणाला होता. इतकंच नाही तर प्रियांकानं निकला प्रेक्षणीय स्थळांची माहितीही दिली होती त्यामुळे येत्या काही दिवसांत हे कथित जोडपं भारतात येणार असल्याच्या चर्चेला उढाण आलं आहे.

First Published on June 14, 2018 1:53 pm

Web Title: nick jonas may accompany priyanka to india visit