22 September 2020

News Flash

…जेव्हा निक बॉलिवूडकरांसोबत फुटबॉल खेळतो

यात निक आणि ईशान एका संघात असून धोनी त्यांच्या विरुद्ध संघात होता.

बॉलिवूडची देसी गर्ल आणि अमेरिकन गायक निक जोनास ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी ही जोडी शक्य तेव्हा वेळ एकमेकांना देताना दिसत आहे. त्यामुळेच सध्या निक प्रियांकासोबत भारतात आला असून रविवारी त्याने मुंबईतील फुटबॉलच्या मैदानावर फुटबॉल खेळण्याचा आनंद लूटल्याचं दिसून आला. या फुटबॉल मॅचचे काही फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये निकसोबत भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी, अभिनेता ईशान खट्टर, आदित्य रॉय कपूर दिसत असून ते निकबरोबर फुटबॉल खेळत आहेत. यात निक आणि ईशान एका संघात असून धोनी त्यांच्या विरुद्ध संघात होता.

 

View this post on Instagram

 

Bae in Bombae!! #friends #mumbai #football @nickjonas

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

ही मॅच सुरु असताना प्रियांका आपल्या मैत्रिणींसोबत मैदानावर बसून मॅच एन्जॉय करत होती. प्रियांका तिच्या आगामी ‘स्काय इज पिंक’ या बॉलिवूड चित्रपटासाठी भारतात आली आहे. त्यामुळे तिला भेटण्यासाठी निकदेखील भारतात आल्याचं सांगण्यात येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 2:19 pm

Web Title: nick jonas played football match ms dhoni and other celebrity
Next Stories
1 ‘लाइफ इन अ मेट्रो’ च्या सिक्वलमध्ये तापसीऐवजी ‘दंगल गर्ल’
2 तनुश्री- नाना वादावर रेणुका शहाणेंचं खुलं पत्र
3 नाना पाटेकर चिंधी अभिनेता-तनुश्री दत्ता
Just Now!
X