26 January 2020

News Flash

निकच्या शर्टलेस फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांवर भडकली प्रियांका, म्हणाली..

निकचा शर्टलेस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

निक जोनास, प्रियांका चोप्रा

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या मायामी व्हेकेशनपासून चांगलीच चर्चेत आहे. सुट्ट्यांमध्ये सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेले फोटो आणि त्यानंतर नेटकऱ्यांनी केलेली टीका यामुळे तिच्या डोक्याला ताप झाला. आता पती निक जोनासने त्याचा शर्टलेस फोटो पोस्ट केल्यानंतर त्यालाही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. त्यामुळे प्रियांका नेटकऱ्यांवर चांगलीच भडकली आहे.

निकचा शर्टलेस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी निकच्या बॉडीवर टिप्पणी केली आहे. आता तुझं बाबा होण्याचं वय झालं आहे, असा टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे. यावर प्रियाकांना एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नाराजी व्यक्त केली आहे. ”ज्याला जसं आवडतं तसं त्यानं जगावं, अशा मताचे आम्ही दोघं आहोत. आमच्या प्रत्येक गोष्टीवर कमेंट करायची असेल तर God Save Us,” अशा शब्दांत तिने राग व्यक्त केला.

आणखी वाचा : ‘सावत्र पित्याकडून अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी’; श्वेता तिवारीच्या मुलीची पोस्ट

”लोकांनी काहीही म्हटलं तरी माझ्यावर त्याचा फरक पडत नाही. आता लोकांना निकच्या शरीरावरही मतं व्यक्त करायची असतील तर देवच आमचं रक्षण करो,” असं ती पुढे म्हणाली.

प्रियांका आणि निक याआधीही विविध कारणांमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. मात्र आता प्रियांकाने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे.

First Published on August 14, 2019 12:45 pm

Web Title: nick jonas shirtless photo trolled by netizens priyanka chopra react against trollers ssv 92
Next Stories
1 साहो चित्रपटात महेश माजंरेकर दिसणार या भूमिकेत
2 Video : पॉर्न स्टार मिया खलिफाने सांगितली स्वतःची कमाई, चाहते म्हणाले खोटं बोलतेय
3 काळीज पिळवटून टाकणारी काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची कथा मोठ्या पडद्यावर, पाहा पोस्टर
Just Now!
X