आंतरराष्ट्रीय कलाविश्वात सध्या चर्चेत असणारी दोन नावं म्हणजे अमोरिकन गायक निक जोनास आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा. भारतीय चित्रपटविश्वात आपली वेगळी अशी ओळख प्रस्थापित केल्यानंतर प्रियांकाने तिचा मोर्चा हॉलिवूडकडे वळवला. तिथेही या देसी गर्लने खऱ्या अर्थाने यश संपादन केलं.

आपल्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी करण्यासोबत प्रियांकाला परदेशी भूमीवर प्रेमही गवसलं, अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत प्रियांका रिलेशनशिपमध्ये आली आणि पाहता पाहता त्यांच्याच नात्याच्या चर्चा रंगू लागल्या. काही दिवसांपूर्वीच प्रियांका आणि निकने त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणाही केली. निक प्रियांकाहून वयाने लहान असला तरीही त्याचं तिच्यावर अतोनात प्रेम असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘बॉलिवूड लाइफ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार प्रियांकावरील प्रेमाखातर निकने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, तिच्या नावाचं एक टॅटू करुन घेण्याचं ठरवलं आहे. आपलं प्रियांकावर असणारं प्रेम व्यक्त करण्यामध्ये निक कुठेच कमी पडत नसल्याचच पाहायला मिळत आहे.

वाचा : Priyanka Chopra Nick Jonas Engagement : निकसोबत प्रेमाचा महाल उभा कर.. आईचा आपुलकीचा सल्ला

दरम्यान, ‘देसी गर्ल’ आणि तिचा हा परदेशी प्रियकर लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोच्या नव्या पर्वाची सुरुवात करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणारी ही जोडी आता करणशी गप्पा मारण्यासाठी येणार का, हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.