News Flash

अभिनेत्रीचा श्वान हरवला! शोधून देणाऱ्याला १ लाख रुपयांच बक्षीस

सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री निधी अग्रवालचा पाळीव श्वान ‘कोको’ हरवला आहे. तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. कोकोला शोधण्याचा निधी प्रयत्न करत आहे. त्याला शोधणाऱ्याला निधीकडून १ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

निधीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली होती. ‘माझा पाळीव श्वान हरवला आहे. त्याचे नाव कोको आहे. त्याला शोधून देणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस म्हणून दिले मिळेल’ असे निधीने फोटो शेअर करत म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nidhhi Agerwal (@nidhhiagerwal)

आणखी वाचा : काय?? अभिनेत्रीच्या नावाने मंदिर? ; जाणून घ्या कोण आहे निधी अग्रवाल

टॉलीवूड नेटने दिलेल्या वृत्तानुसार निधीचा पाळीव श्वान तिच्या बंगळूरू येथील घरातून बेपत्ता झाला आहे. त्याला शोधण्यासाठी निधीने चाहत्यांची मदत घेतली आहे. तसेच त्याला शोधणाऱ्याला १ लाख रुपये बक्षीस मिळणार आहे.

निधीने २०१७मध्ये अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. तिने बॉलिवूडमधील ‘मुन्ना माइकल’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर तिने २०१८ आणि २०१९मध्ये काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. ज्यामध्ये ‘सव्यसाची’, ‘मिस्टर मजनू’, ‘आईस्मार्ट शंकर’ या चित्रपटांचा समावेश आहे. आता निधीचे ‘भूमि’ आणि ‘पूनगोडी’ हे तामिळ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 12:07 pm

Web Title: niddhi agerwal announces rs 1 lakh award to trace her coco avb 95
Next Stories
1 करीनाच्या दुसऱ्या मुलाला सोशल मीडियावर गरजेपेक्षा जास्त महत्व दिले जाते- आदर्श गौरव
2 ७४ वर्षीय रणधीर कपूर यांनी केली करोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
3 सुरेश वाडकरांनी माधुरीला दिला होता लग्नासाठी नकार, जाणून घ्या कारण
Just Now!
X