21 January 2021

News Flash

अभिनेत्रीनं शेअर केला ‘बाथरुम सेल्फी’; काही तासांत मिळाले ६ लाख व्हूज

अभिनेत्रीनं बाथरुममध्ये केलं फोटो शूट; फोटो होतोय व्हायरल...

टायगर श्रॉफच्या ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री निधी अग्रवाल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ऑनलाईन पोस्ट, ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी देखील तिने अशाच एका फोटोमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. निधीने स्वत:चा बाथरुम सेल्फी शेअर केला आहे. तिचा हा सेल्फी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे काही तासांत या फोटोला सहा लाखांपेक्षा अधिक व्हूज मिळाले आहेत.

अवश्य पाहा – ये फिटनेस की बात है! पाहा मलायकाचा ‘हॉट योगा’

 

View this post on Instagram

 

Bathroom selfie

A post shared by Nidhhi Agerwal (@nidhhiagerwal) on

अवश्य पाहा – फॅट ‘गंगूबाई’चा फिट अवतार; ८ महिन्यात २२ किलो वजन केलं कमी

निधी अग्रवाल ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘मिस्टर मंजु’ या तेलुगु चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. हा सुपरहिट चित्रपटानंतर बॉलिवूड निर्मात्याचं देखील लक्ष तिच्याकडे वळलं. २०१७ मध्ये ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु हा चित्रपट तिकिट बारीवर फ्लॉप ठरला. त्यानंतर निधीनं पुन्हा एकदा आपलं लक्ष दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळवलं. गेल्या काही काळात ‘स्मार्ट शंकर’, ‘भूमी’, ‘निनू कुरी’, ‘मायावन’ यांसारख्या काही चित्रपटांमध्ये झळकली. चित्रपटांसोबतच ‘बिग बॉस’ तमिळमध्येही ती झळकली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 4:30 pm

Web Title: nidhi aggarwal posted bathroom selfie mppg 94
Next Stories
1 Bigg Boss : ‘या’ स्पर्धकाला करावा लागला आर्थिक संकटाचा सामना, म्हणाला…
2 “मला न्याय का मिळाला नाही?”; नाना पाटेकर यांच्या पुनरागमनावर तनुश्री दत्ता संतापली
3 अमिताभ बच्चन- अजय देवगण ७ वर्षांनी एकत्र!
Just Now!
X