अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्स सेवनासह अन्य आरोपांखाली मंगळवारी अटक करण्यात आली. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रियाला पाठिंबा दिला आहे. यामध्ये चित्रपट निर्माता निखील द्विवेदी याने रियासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
निखील द्विवेदीने ट्विट करत रियासोबत काम करायची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.
#Rhea I didn’t kno u. I dn’t kno wht kind of person u r. May b u r as bad as u r being made out to b. May b u r not. Wht I do kno is tht how its all played out for u is unfair, unlawful ¬ how civilised countries behave. Whn all ths is over we wud like to work wth u @Tweet2Rhea
— Nikhil Dwivedi (@Nikhil_Dwivedi) September 8, 2020
“रिया, मी तुला ओळखत नाही. मला नाही माहित एक व्यक्ती म्हणून तू नेमकी कशी आहेस. कदाचित तू खरंच तितकी वाईट असशील जितकं तुला दाखवण्यात येत आहे. कदाचित तशी नसशील सुद्धा. पण मला एक समजतंय की तुझ्यासोबत जे घडतंय ते अत्यंत चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे. एक सुसंस्कृत देश असं करेल असं नाही हे. पण जेव्हा हे सगळं प्रकरण संपेल तेव्हा नक्कीच मला तुझ्यासोबत काम करायला आवडेल”, असं ट्विट निखीलने केलं आहे.
दरम्यान, निखीलचं हे ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. विशेष म्हणजे सध्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी रियाला पाठिंबा दिला आहे. त्यामध्येच सध्या काही हॅशटॅगदेखील व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 9, 2020 12:18 pm