News Flash

” ते माझा बलात्कार करतील अशी भीती होती”, अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ भयानक अनुभव

अभिनेत्री निकिता रावलला बंदुकीचा धाक दाखवत चोरट्यांनी लुटलं.

nikita-rawal
(Photo-Instagram@nikita_rawal)

अभिनेत्री निकिता रावलने नुकताच एका भयानक घटनेचा सामना केला आहे. दिल्लीतील शास्त्री नगर परिसरात काही गुंडाने बंदुकीचा धाक दाखवत निकितीकडील जवळपास ७ लाखा रुपयांच्या वस्तू लुटल्या आहेत. काही मास्क घातलेल्या गुंडांनी निकिताचं अपहरण करून तिच्याकडील वस्तू चोरल्या. यावेळी निकिता तिच्या काकूंच्या घरी थांबली होती. या घटनेनंतर निकिता लगेचच दिल्लीहून मुंबईला परतली.

हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत निकिता म्हणाली, “जवळपास १० वाजताची वेळ असेल. मी माझ्या काकूंच्या घरी निघाले होते. तेव्हा एक इनोव्हा कार माझ्या समोर आडवी आली. त्यानंतर गाडीतील ४ मास्क घातलेल्या लोकांनी बंदूकीचा धाक दाखवत माझ्याकडील सर्व वस्तू चोरल्या. या घटनेबद्दल बोलताना मला अजूनही भिती वाटतेय.” या चोरांनी निकिताकडील अंगठी, घड्याळ, कानातले, हिऱ्याचं पेंडेंट आणि काही रोख रक्कम चोरली. या संपूर्ण वस्तूंची किंमत जवळपास ७ लाख रुपये असल्याचं निकिताने सांगितलं आहे.

हे देखील वाचा: KBC 13: १२.५० लाखासाठी विचारलेल्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला गेम, तुम्हाला देता येईल का या प्रश्नाचं उत्तर?

पुढे निकिता म्हणाली, “त्यावेळी मला वाटलं होतं हे लोक मला जीवे मारतील. त्याहून जास्त भिती होती ती म्हणजे चोरी केल्यानंतर यांनी माझा रेप केला तर…त्या १० मिनिटांमध्ये मी कोणत्या स्थितीचा सामना केला हे शब्दात मांडणं देखील कठिण आहे. या घटनेनंतर मी घरी पोहचले. घरी कुणींच नसल्याने मी स्वत:ला लॉक करून घेतलं. सकाळ होताच मी मुंबईला परतले. कारण तिथे मला सुरक्षित वाटत नव्हतं.”
या घटनेनंतर निकिता मानसिक ताणावाखाली असून तिला झोपदेखील लागत नसल्याचं ती म्हणाली. ही आयुष्यातील सर्वात वाईट घटना असल्याचं निकिता म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikita Rawal (@nikita_rawal)

२००७ सालामध्ये निकिताने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. तिने ‘मिस्टर हॉट मिस्टर कूल’, ‘द हिरो अभिमन्यू’ आणि ‘अम्मा की बोली’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसचं निकिता लवकरच ‘रोटी कपडा और रोमान्स’ मध्ये अर्शद वारसी आणि चंकी पांडे सोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2021 1:20 pm

Web Title: nikita rawal robbed gunpoint in delhi said dreaded that they would rape me kpw 89
Next Stories
1 वरुणला किसिंग सीनसाठी किती गुण देशील?, आलिया म्हणते…
2 KBC 13: १२.५० लाखासाठी विचारलेल्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला गेम, तुम्हाला देता येईल का या प्रश्नाचं उत्तर?
3 मला वयाच्या ६० वर्षापर्यंत केबीसी होस्ट करायला आवडेल : शाहरुख खान