News Flash

करोनामुळे निक्की तांबोळीच्या भावाचे निधन

तो २९ वर्षांचा होता.

‘बिग बॉस १४’मधील स्पर्धक, अभिनेत्री निक्की तांबोळीचा भाऊ जतिन तांबोळीचे निधन झाले आहे. करोनामुळे निक्कीच्या २९ वर्षीय भावाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला.

निक्कीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर भावासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, ‘मला माहिती नव्हते आज सकाळी देव तुला आमच्यापासून लांब घेऊन जाईल. आम्ही तुझ्यावर प्रचंड प्रेम केले आणि ते करत राहू. तुझ्या जाण्याने आम्हाला दु:ख झाले आहे. तू एकटा आम्हाला सोडून गेलेला नाहीस. तुझ्यासोबत आमच्या सर्वांच्या आयुष्यातील एक भाग देखील गेला आहे. आम्ही तुला पाहू शकत नाही पण तू नेहमी आमच्यासोबत आहेस’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

काही दिवसांपूर्वी निक्कीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिचा २९ वर्षीय भाऊ अनेक आजारांशी झुंज देत असल्याचे सांगितले होते. ‘२० दिवसांपूर्वीच माझ्या भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला टीबी आणि करोना झाला आहे. त्याला न्यूमोनिया देखील झाला होता’ असे निक्कीने म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 3:51 pm

Web Title: nikki tamboli brother jatin dies due to covid 19 avb 95
Next Stories
1 रवीना टंडनकडून 300 ऑक्सिजन सिलेंडर्स ; म्हणाली,”रूग्णालयात लोकांची लूट होतेय….”
2 जेव्हा शूटिंग लवकर संपत तेव्हा!, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमधील कलाकारांचा धमाल डान्स
3 “आम्हाला ‘टीव्ही कलाकार’ असा लेबल दिला जातो”, घराणेशाहीवर अभिनेत्याने व्यक्त केला संताप
Just Now!
X