News Flash

बिग बॉस १४मध्ये दोन नव्या स्पर्धकांची एण्ट्री

जाणून या स्पर्धकांविषयी...

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. सध्या बिग बॉसचे १४चे पर्व चर्चेत आहे. एकीकडे निक्की तंबोळी घरातून बाहेर पडली आहे तर दुसरीकडे दोन नवे स्पर्धक बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार आहेत.

नुकताच बिग बॉस १४मध्ये विकेंडचा वारमध्ये सलमान खानने स्पर्धकांशी संवाद साधला. दरम्यान त्याने राहुल वैद्यला दिलेला टास्क योग्य पद्धतीने न खेळल्यामुळे सुनावले आहे. त्यानंतर त्याने बिग बॉसचे एक्स स्पर्धक मास्टर माइंड विकास गुप्ता आणि अभिनेत्री राखी सावंत हे बिग बॉस १४मध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले. शनिवारी या दोन्ही स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात एण्ट्री झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

कलर्स टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस १४मधील एका भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये राखी सावंत डान्स करताना दिसत आहे. तर विकास गुप्ता शांत उभा असल्याचे दिसत आहे. शोमध्ये विकास आणि राखीची एण्ट्री झाल्यानंतर स्पर्धक आश्चर्यचकित झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 10:36 am

Web Title: nikki tamboli evicted from bigg boss 14 finale week avb 95
Next Stories
1 आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलजीतनं एक कोटींची केली मदत, कारण वाचून तुम्हालाही वाटेल आभिमान
2 चित्ररंजन : अलवार नात्याची गोष्ट
3 ‘माझ्यातील स्वानंदी टिकेकर गायन कौशल्याची नव्याने ओळख’
Just Now!
X