25 February 2021

News Flash

“पालकांनी काही संस्कार केले की नाही?”; राखीच्या शिव्या ऐकून निक्कीची आई संतापली

राखी-निक्कीमध्ये जोरदार भांडण; अश्लिल शब्द ऐकून निक्कीची आई संतापली

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असते. मात्र यावेळी ती बिग बॉसच्या घरात केलेल्या अश्लिल शब्दप्रयोगांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री निक्की तांबोळीची आई राखीवर संतापली आहे. बिग बॉस लहान मुलं देखील पाहतात त्यामुळे आपल्या अश्लिल शब्दप्रयोगांवर थोडी तरी मर्यादा ठेव असा सल्ला तिनं राखीला दिला आहे.

अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा बिकिनी अवतार; हॉट फोटोशूटमुळे चाहते अवाक

निक्की तांबोळी आणि राखी सावंत या दोन स्पर्धकांमध्ये सध्या बिग बॉसच्या घरात जोरदार भांडण सुरु आहे. मात्र या भांडणादरम्यान राखीनं अश्लिल शब्दप्रयोगांचा वापर केला. हे शब्द ऐकून निक्कीची आई संतापली. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत तिने राखीला तिच्या पालकांकडून मिळालेल्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित केले.

अवश्य पाहा – अरे बापरे… ही अभिनेत्री एका फोटोशूटसाठी घेते २०० कोटी

त्या म्हणाल्या, “राखी अत्यंत बेजबाबदार स्त्री आहे. आपण काय बोलतोय याचं देखील तिला भान नसतं. वाद-विवाद करण्याची देखील एक पद्धत असते. शिव्या न देता, अश्लिल शब्दप्रयोग न करता सभ्य भाषेत आपण एखाद्याशी वाद घालू शकतो हे तिला माहितच नाही. बहुदा आई-वडिलांनी तिच्यावर असेच संस्कार केले असावेत. असो, तिने शिवीगाळ करत इतर कोणाशीची बोलावं पण माझ्या मुलीच्या बाबतीत बोलू नये. कृपया बिग बॉसने राखीला शिवीगाळ न करण्याचा इशारा द्यावा ही विनंती.” असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 1:41 pm

Web Title: nikki tamboli fight with rakhi sawant bigg boss 14 mppg 94
Next Stories
1 सनासारख्या फ्लॉप अभिनेत्रीसोबत लग्न का केलं?; अनसने ट्रोलर्सला दिलं जोरदार प्रत्युत्तर
2 रितेशच्या ४० व्या वाढदिवशी जेनेलियाने दिलं होतं हे ‘लय भारी’ गिफ्ट; फोटो पाहून फिटतील डोळ्याची पारणं
3 “…तेच खरे देशभक्त”; कंगनाने केलं नवं ट्विट
Just Now!
X