News Flash

‘तू मला दिसत नाहीस’; आकाशाकडे बघत भावाच्या आठवणीत निक्की झाली भावूक

तिची ही पोस्ट चर्चेत आहे.

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १४’मधून स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री निक्की तांबोळीच्या भावाचे करोनामुळे निधन झाले. निक्कीचा भाऊ जतिन तांबोळी हा २९ वर्षांचा होता. भावाच्या निधनानंतर निक्की सोशल मीडियावर भावाच्या आठवणीत पोस्ट शेअर करताना दिसते. नुकताच तिने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे.

निक्की लवकरच ‘खतरों के खिलाडी ११’मध्ये दिसणार आहे. त्यासाठी ती केपटाउनला रवाना झाली आहे. दरम्यान तिने इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. हा आकाशाचा फोटो शेअर करत ती भावूक झाली आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘तू मला दिसत नाहीस’ असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील बापूजींनी गायले किशोर कुमार यांचे गाणे, व्हिडीओ व्हायरल

खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होण्यापूर्वी निक्कीने सांगितले होते की तिच्या भावाची इच्छा होती तिने या शोमध्ये सहभागी व्हावे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. ‘मी माझ्या आयुष्याच्या अशा वळणावर आहे जिथे एकीकडे माझे कुटुंबीय कठिण काळातून जात आहे आणि दुसरीकडे माझ्या कामाच्या कमिटमेंट’ असे तिने म्हटले होते.

४ मे रोजी निक्की तांबोळीचा भाऊ जतिन तांबोळीचे निधन झाले. तो २९ वर्षांचा होता. त्याला टीबी, न्यूमोनिया आणि करोना झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 12:34 pm

Web Title: nikki tamboli missing her late brother jatin tamboli shared emotional post avb 95
Next Stories
1 अंकिता लोखंडेने घेतला करोना लसीचा पहिला डोस; लस घेतांना केला स्वामींचा धावा
2 “हे ही दिवस जातील…. सरी सुखाच्या येतील”; व्हिडीओ शेअर करत शेवंता चाहत्यांना म्हणाली…
3 अभिनेत्री कंगना रणौतला झाला करोना
Just Now!
X