News Flash

‘तुला पाहते रे’ मालिकेतील ‘सौ. निमकर’ यांना निळू फुलेंकडून मिळाली ही शिकवण

लोकप्रियतेच्या बाबतीत या मालिकेने उच्चांक गाठले असून यातील कलाकारांचीही जोरदार चर्चा होत आहे.

निळू फुले आणि त्यांची कन्या गार्गी फुले थत्ते

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. लोकप्रियतेच्या बाबतीत या मालिकेने उच्चांक गाठले असून यातील कलाकारांचीही जोरदार चर्चा होत आहे. अभिनेता सुबोध भावे, नवोदित अभिनेत्री गायत्री दातार आणि तिच्या आईच्या भूमिकेतील गार्गी फुले थत्ते यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. ‘विक्रांत’ आणि ‘ईशा’ यांच्या भूमिकेभोवती जरी या मालिकेची कथा फिरत असली तरी ईशाची आई सौ. निमकर यांचीही भूमिका तेवढ्याच ताकदीची आहे. गार्गी फुले या दिग्गज अभिनेते निळू फुले यांच्या कन्या आहेत. सुरुवातीला गार्गी यांनी ‘तुला पाहते रे’ मालिकेतील भूमिका नाकारली होती.

मालिकेतील भूमिका कशी मिळाली याबद्दल त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं, ”कट्टी बट्टी’ या मालिकेमुळे मी आधी सौ. निमकर ही भूमिका नाकारली होती. पण निर्माते माझ्यासाठी थांबले आणि माझ्या पदरात सोनं पडलं. माझी भूमिका लोकांना आवडत आहे हीच माझ्या कामाच्या पोचपावती आहे. ईशाची आई अत्यंत साधी, भोळी आहे. तिच्या स्वभावातील साधेपणा माझ्यातही आहे. त्यामुळे या भूमिकेच्या मी प्रेमातच पडले आहे.’

वाचा : जाणून घ्या, ‘तुला पाहते रे’ मालिकेतील गायत्री दातारविषयी

वडील निळू फुले यांनी अभिनयाची दिलेली एक शिकवण कायम लक्षात ठेवत असल्याचंही गार्गी यांनी सांगितलं. ‘बाबांची एक गोष्ट माझ्या कायम लक्षात राहणार आहे. ते मला सांगायचे, जेव्हा तू कॅमेरासमोर जाशील तेव्हा तू स्वत: अमिताभ बच्चन आहेस असंच समज. तुझ्यासमोर कितीही मोठा कलाकार असला तरी तुझं अभिनय दमदारच असलं पाहिजे,’ असं त्यांनी म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 11:06 am

Web Title: nilu phule daughter gargi phule thatte in tula pahate re marathi serial
Next Stories
1 #MeToo : तिच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर करत सुशांत सिंग राजपूतने फेटाळले आरोप
2 ‘तानाजी’ चित्रपटात सलमान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका?
3 मैत्रीवर भाष्य करणारा ‘व्हॅनिला…’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X