News Flash

‘तू दिलेली ही शिकवण कधीच विसरणार नाही’; निळू फुलेंसाठी मुलीची भावनिक पोस्ट

गार्गी यांनी 'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री गायत्री दातारच्या आईची भूमिका साकारली होती.

गार्गी फुले थत्ते, निळू फुले

आपल्या अफाट अष्टपैलू अभिनयाच्या गुणांवर कायमस्वरूपी ठसा उमटवलेले गंभीर प्रवृतीचे कलाकार म्हणजे निळू फुले. ११ वर्षांपूर्वी १३ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. निळू फुले यांची मुलगी व अभिनेत्री गार्गी फुले- थत्ते यांनीही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली.

‘बाबा… आज तुला जाऊन ११ वर्षे झाली. शरीराने लांब कुठेतरी गेलास पण मनाने अजूनही माझ्याबरोबर आहेस आणि राहशील आणि सतत सांगत राहशील की नन्या बाकी कशीही रहा, कुठेही रहा पण समाजाचं आपण देणं लागतो हे विसरू नकोस. डोंट वरी बाबा, तू दिलेली माणुसकीची ही शिकवण मी कधीही विसरणार नाही.. आय लव्ह यू बाबा’, अशा शब्दांत गार्गी यांनी भावना व्यक्त केल्या.

गार्गी यांनी ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री गायत्री दातारच्या आईची भूमिका साकारली होती. मालिकेत ईशाची आई सौ. निमकर यांची भूमिका ताकदीची होती. ही भूमिका गार्गी यांनी साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 11:34 am

Web Title: nilu phule daughter gargi phule thatte remember veteran actor on his death anniversary ssv 92
Next Stories
1 सुशांतच्या मृत्यूवर अंकिता लोखंडेने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाली…
2 अभिनयानंतर सायली रमली डबिंगमध्ये; ‘या’ चित्रपटासाठी दिला आवाज
3 बोटिंगला गेलेल्या अभिनेत्रीचा मृत्यू; आठवड्याभरानंतर सापडला मृतदेह
Just Now!
X