07 March 2021

News Flash

या प्रसिद्ध मालिकेच्या अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा

कोरिओग्राफरशी या अभिनेत्रीचा साखरपुडा झाला असून गेल्या पाच वर्षांपासून ती लिव्ह- इनमध्ये राहत होती.

कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नानंतर आता प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाची चर्चा आहे. छोट्या पडद्यावरही लग्नाचीच धूम पाहायला मिळत आहे. स्टार भारत वाहिनीवरील ‘निमकी मुखिया’ या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री भूमिका गुरुंग हिचा नुकताच साखरपुडा झाला. प्रियकर अमित सिंग गोसेन ऊर्फ कीथ याच्याशी तिचा साखरपुडा पार पडला आणि याची कोणालाच तिने कानोकान खबर लागू दिली नाही.

भूमिका आणि अमित गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. अमित नृत्यदिग्दर्शक आहे. ‘कीथ आणि मी पाच वर्षांपासून एकत्र राहत आहोत. त्यामुळे लपूनछपून लग्न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्या दोघांच्याही घरी याची कल्पना आहे आणि आमचे पालक एकमेकांना अनेकदा भेटले आहेत. माझा रोका झाला असून लग्नाची आम्हा दोघांनाही घाई नाही,’ असं भूमिका म्हणाली.

भूमिका आणि अमित यांचं काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाल्याचीही चर्चा होती. पण ‘आमच्यातील तो फक्त एक वाद होता, इतकंच’ असं म्हणत अमितसोबत पॅचअप केल्याचं तिने नंतर स्पष्ट केलं. भूमिका आणि अमित यांची ओळख एका मित्राकडून झाली. लग्नानंतरही मी अभिनय क्षेत्रात काम करतच राहीन असं भूमिकाने स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 10:21 am

Web Title: nimki mukhiya fame actress bhumika gurung gets engaged to beau keith
Next Stories
1 आमिरने स्वीकारली Thugs Of Hindustan फ्लॉप झाल्याची जबाबदारी
2 राखी सावंतला करायचीय अनुप जलोटांसोबत अंघोळ
3 स्टँडअप कॉमेडीमध्ये प्रवेश करणारी सई ताम्हणकर पहिली स्टार
Just Now!
X