मराठी कलाविश्वातील अभिनेता दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी नुकताच बाबा झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे. निपुणच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
निपुण आणि संचिता चांदोरकर यांच्या लग्नाला पाच वर्ष झाल्यानंतर त्यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. निपुणने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यात एका फोटोमध्ये त्याची चिमुकली आईची कुशीत झोपली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये निपुणच्या खांद्यावर त्याचं बाळ अलगदपणे झोपलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, निपुण धर्माधिकारी हे नाव मराठी कलाविश्वातील लोकप्रिय व्यक्तींपैकी एक आहे. भाडिपा म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टीमुळे तो विशेष प्रकाशझोतात आला. त्यासोबतच त्याने संगीत मानापमान, संगीत सौभद्र या संगीत नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. तर एमएक्स प्लेअरवरील Once a Year नावाच्या वेब सीरिजमध्येही त्याने काम केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2021 2:38 pm