27 May 2020

News Flash

‘देशातील गद्दारांवर सर्जिकल स्टाइक करा’; अभिनेत्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी

कवितेच्या माध्यमातून त्याने राग व्यक्त केला आहे

तबलिगी जमातीच्या मरकज या कार्यक्रमात करोनाची लागण झालेले काही रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे यातील काही रुग्णांवर गाझियाबादमधील एमएमजी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या रुग्णांनी रुग्णालयातील प्रशासनासोबत गैरवर्तन केल्यामुळे भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव निरहुआ याने संताप व्यक्त केला आहे. ‘देशात राहून अशा कारवाया करणाऱ्यावर सर्जिकल स्टाइक करण्याची गरज आहे’, असं त्याने म्हटलं आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीच्या मरकज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये असंख्य लोकांनी उपस्थिती दर्शविली होती.मात्र या कार्यक्रमानंतर करोनाचा फैलाव वाढल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर गुरुवारी देशभरातील ४८५ करोनाग्रस्त नवे रुग्ण आढळून आले. यापैकी काहींवर गाझियाबादमधील एमएमजी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र या रुग्णांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांसोबत गैरवर्तन केल्याचं समोर आलं. त्यामुळेच निरहुआ याने कवितेच्या माध्यमातून त्याचा संताप व्यक्त केला आहे. तसंच ‘देशात राहून बेइमानी करणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राइक करायला हवा’ ,अशी मागणी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

 

View this post on Instagram

 

मोदी जी ऐलान करो देश द्रोहियों को मरना होगा सर्जिकल स्ट्राइक एक बार अब घर में भी करना होगा इंसानियत के दुश्मन कैसे इंटा पत्थर फेंक रहे पुलिसकर्मी लाचार खड़े होकर के इनको देख रहे इसी लिए सरकार ने इनको हाथों में बन्दूक दिया कैसे साला आतंकी वर्दी पे इनके थूक दिया बहुत सालों को माफ़ किया अब इन्हें साफ़ करना होगा मोदी जी ऐलान करो देशद्रोहियों को मरना होगा दुश्मन देश ने भेंजा है ना परमाणु से कम समझो इंसान नही हैं इन कुत्तों को बस कोरोना बम समझो इनपे ना कोई बकैति होगी नही कोई धरना होगा मोदी जी ऐलान करो देशद्रोहियों को मरना होगा सर्जिकल स्ट्राइक एक बार अब घर में भी करना होगा दिनेश लाल यादव (निरहुआ) #narendramodi #amitshahofficial #yogiadityanath #rajnathsingh #indianarmy #crpfindia #indianarmychief #indiafightscorona

A post shared by Nirahua (@dineshlalyadav) on

दरम्यान, राग अनावर झाल्यामुळे निरहुआने कवितेच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. ही कविता त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली असून सध्या ती चांगलीच व्हायरल होत आहे.  तबलिगी जमातचा हा कार्यक्रम मात्र दिल्लीत पार पडला. या कार्यक्रमाला २५०० लोक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी हजर राहिलेल्या अनेकांचा करोना व्हायरसची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तर हजारो लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला हजर राहिलेल्या अनेकांचा शोध घेतला जात आहे. दिल्लीतील निझामुद्दीन हे ठिकाण करोनाचं हॉटस्पॉट झालं असून २००० लोकांना यामुळे करोनाची लागण झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारे या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्यांना पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन केलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 1:35 pm

Web Title: nirhua writes poem and appeal to pm narendra modi for surgical strike n own country to defeat coronavirus
टॅग Coronavirus
Next Stories
1 “दिव्यांमध्ये काय वापरायचं तेल की तूप?”; बॉलिवूड दिग्दर्शकाला पडला प्रश्न
2 रामायण : ‘भरत’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने वयाच्या ४०व्या वर्षी घेतला होता जगाचा निरोप
3 मोदींना अभिनेत्याचा उपरोधिक टोला : “घरातील दिवे बंद केल्यानं करोना पळून जाईल”
Just Now!
X