News Flash

भूतकाळातल्या सावल्यांचा उलगडा.. निर्मलाचा अतृप्त आत्मा सर्वांसमोर येणार!

निर्मलाचा आत्मा अतृप्त असल्याने वाड्यात कोणा कोणाच्या जीवाला धोका?

भूतकाळातल्या सावल्यांचा उलगडा.. निर्मलाचा अतृप्त आत्मा सर्वांसमोर येणार!
निर्मलाचे हे रूप “चाहूल” या मालिकेत ३० जानेवारीला रात्री १०.३० वा. पाहता येईल.

सध्या चाहूल ही कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. मालिकेमधील जेनी ही अल्पवधीतच प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. तर मालिकेमध्ये वापरण्यात आलेली वेगवेगळ्या कॅमेरा टेकनिक्समुळे प्रेक्षकांना ही मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळी वाटत आहे. मालिकेच्या कथानकाबद्दल तर उत्कंठा आहेच पण आता एक वेगळीच चाहूल लागली आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये आणि हे सगळं होत असताना सर्जेरावांना एक प्रश्न आहे की त्यांची बालपणाची मैत्रीण निर्मला गेली कुठे? तिचा पत्ता कुठेच लागत नाहीये. त्यावर बबन्याला माहिती असलेलं सत्य सर्जेरावांपर्यंत पोहचेल की त्याचे प्रश्न निरुत्तरित राहतील ? या सगळ्या प्रश्नांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. पण आता ही उत्सुकता मिटणार आहे. कारण निर्मलाच भवानिपुरमध्ये परतली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना हा ड्रामा बघायला नक्कीच मज्जा येणार आहे यात शंका नाही.

इतक्या महिन्यांपासून सर्जेरावला आणि प्रेक्षकांना पडलेल्या निरुत्तरित प्रश्नाच उत्तर मिळणार आहे अस वाटत आहे. निर्मला भवानिपूरमध्ये आली आहे. तिच्या आत्म्याच्या येण्यामागचा हेतू आणि तिच्या मृत्यूमागच रहस्यदेखील उलगडणार का ? असा प्रश्न प्रेक्षकांना पडण सहाजिक आहे. निर्मला पहील्यांदाच समोर येणार आहे या कल्पनेनेच मालिकेमध्ये अनेक रहस्य उलगडणार हे नक्की. पण निर्मलाचा आत्मा अतृप्त असल्याने वाड्यात कोणा कोणाच्या जीवाला धोका आहे? वाड्यामध्ये निर्मालाचा आत्मा नक्की काय करणारआहे ? यामध्ये जेनीवर कोणते नवे संकट येणार? हे सगळेच प्रश्न आहेत. ती वाड्यामध्ये कोणा बरोबर सूड घेणार आणि कोणत्या पद्धतीने ? तसेच अरुंधती आणि निर्मला यांमधील टशन देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

pic-chaahool

आतापर्यंत खूप अकलनीय घटना घडल्या त्याच कारण आजवर कोणालच कळले नव्हते. पण आता त्याचा उलगडा होणार आहे. कारण निर्मलाचा आत्मा सर्वांसमोर येणार आहे. तेव्हा निर्मलाचे हे रूप “चाहूल” या मालिकेत ३० जानेवारीला रात्री १०.३० वा. पाहता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2017 8:41 am

Web Title: nirmalas insatiable spirit will soon seen in chaahul marathi serial
Next Stories
1 टॅाकीज नाईट्सचा पुणेरी तडका
2 प्रजापती दक्षंच्या साक्षीने ओंकार गणेश उलगडणार देवी पार्वतीच्या पुनर्जन्माची गाथा!
3 शाहरूखला पाहण्यासाठी बडोदा रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी, एकाचा मृत्यू
Just Now!
X