News Flash

‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड साकारणार जिजाऊंची भूमिका

या भव्यदिव्य मालिकेतून बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत अजिंक्य देव, छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत भूषण प्रधान झळकणार आहे.

(Photo-PR)

स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत जिजाऊंची भूमिका कोण साकारणार याची कमालीची उत्सुकता होती. छत्रपती शिवरायांना स्वराज्याचं बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड. निशिगंधा वाड या इतिहासाच्या अभ्यासक आहेत. त्यामुळे जिजाऊ साकारणं हा अत्यंत सुखद अनुभव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

“अशी पालनकृत, ताठ कण्याची, कर्तबगार, कर्तृत्ववान जिजाऊ साकारणं हे भाग्याचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. इतकी कणखर भूमिका साकारायला मिळणं हा दैवी योग आहे.” असं निशिगंधा वाड म्हणाल्या.

जवळपास १० वर्षांनंतर निशिगंधा वाड या मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहेत. या दमदार कमबॅकसाठी त्या खुपच उत्सुक आहेत. या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना निशिगंधा वाड म्हणाल्या, ‘हे पात्र साकारताना आणि जिजाऊंच्या रुपात उभं करण्यामागे बऱ्याच जणांचे कष्ट आहेत. अगदी लेखकापासून, दिग्दर्शक, मेकअपमनपासून प्रत्येकाची मेहनत आहे. त्यामुळे अभ्यासपूर्वक आलेलं हे पात्र साकारताना मी कुठेही कमी पडू नये यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. छत्रपती शिवरायांसाठी समर्पण दिलेल्या शिलेदारांची गोष्ट मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजते की मी देखिल या महत्त्वाकांक्षी मालिकेचा अंश आहे.” असं त्या म्हणाल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

हे देखील वाचा: “मेकअपचा मोक्कार थर”, नव्या फोटोशूटमुळे श्रुती मराठे ट्रोल

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची आहे. २६ जुलैपासून रात्री १० वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट भेटीला येणार आहे. या भव्यदिव्य मालिकेतून बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत अजिंक्य देव, छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत भूषण प्रधान, नेतोजी पालकरांच्या भूमिकेत कश्पय परुळेकर आणि शिवा काशिदच्या भूमिकेत विशाल निकम अशी दमदार कलाकारांची फौज या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 1:43 pm

Web Title: nishigandha wad will play jijamata in jai bhawani jai shivaji kpw 89
टॅग : Entertainment
Next Stories
1 ‘टायगर ३’ सिनेमासाठी सलमान खान गाळतोय घाम; वर्कआउटचा व्हिडीओ पाहून चाहते थक्क
2 लग्नानंतर पहिल्यांदाच मिताली- सिद्धार्थ एकत्र, ‘या’ सीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3 राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टी सुद्धा…? पोलिसांनी दिलं हे उत्तर
Just Now!
X