बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर नितिश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न सर्वत्र चर्चेत आहे. दरम्यान या प्रश्नावर अभिनेता कमाल आर. खान याने प्रतिक्रिया दिली आहे. जर नितिश कुमार मुख्यमंत्री झाले तर त्यांना भाजपाच्या हातची बाहुली बनून राहावं लागेल असं मत त्याने मांडलं आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केला ‘बाथरुम सेल्फी’; काही तासांत मिळाले ६ लाख व्हूज

What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी, “भाकड जनता पक्षाचा नवा सिझन आलाय जुमला तीन, अभिनेता तोच, व्हिलन आणि..”
Karnataka CM Siddaramaiah calls PM Modi nalayak loksabha election 2024
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?
Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी कायम राहू शकतात? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
kalyan lok sabha marathi news, vaishali darekar latest news in marathi
वैशाली दरेकर : उत्तम वक्त्या आणि आक्रमक चेहरा, कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून महिला उमेदवार रिंगणात

कमाल खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. यावेळी त्याने बिहार निवडणुकीचं निमित्त साधून भाजपावर निशाणा साधला आहे. “भाजपाला जवळपास ८० जागा मिळतील अन् जेडीयुला ४० अशी चिन्ह आहेत. या पार्श्वभूमीवर नितिश कुमार मुख्यमंत्री होणार का? जर ते मुख्यमंत्री झाले तर त्यांना भाजपाच्या हातची बाहुली बनूनच राहावं लागेल. ज्याची त्यांना सवय नाही. येत्या काळात बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन पेच फसणार हे नक्की आहे.” अशा आशयाचं ट्विट कमाल खानने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – नखरे करणं अभिनेत्रीला पडलं भारी; १८ व्या दिवशी मालिकेतून काढून टाकलं

निवडणूक प्रचारात आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत असे भाजपाचे नेते म्हणत होते. पण बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर भाजपा मुख्यमंत्री सोडेल का? हा कळीच मुद्दा आहे. या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जेडीयूला फारशी चमकादार कामगिरी करता आलेली नाही. प्रथमच राज्यात भाजपा मोठया भावाच्या भूमिकेत जाऊ शकतो, त्यामुळे नितीश कुमार यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भाजपावर अवलंबून असेल.