News Flash

दूर हटो..

बॉलिवूडमध्ये लग्नासाठी सगळ्यात सुयोग्य वर कोणता असेल? अर्थातच ज्याच्यावर तरुणी आपला जीव ओवाळून टाकायला तयार आहेत असा सुप्रसिध्द तरीही अविवाहित तरूण आणि त्यातही कपूर खानदानचा

| April 3, 2013 01:05 am

बॉलिवूडमध्ये लग्नासाठी सगळ्यात सुयोग्य वर कोणता असेल? अर्थातच ज्याच्यावर तरुणी आपला जीव ओवाळून टाकायला तयार आहेत असा सुप्रसिध्द तरीही अविवाहित तरूण आणि त्यातही कपूर खानदानचा कुलदीपक रणबीर क पूर! आपल्या गुणी मुलासाठी कुठे कुठे नवरी शोधू?, असे कोणत्या आईला वाटणार नाही. पण, रणबीरची आई नीतू कपूरला खरोखरच आपल्या मुलासाठी कोणतीच मुलगी नको आहे. एकीकडे दीपिकाबरोबरच्या प्रेमभंगातून सावरलेला रणबीर सध्या कतरिना कैफच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. ‘यह जवानी है दिवानी’च्या प्रमोशनच्या वेळी दीपिकामध्ये आणि आपल्यात मैत्रीशिवाय काही उरलेले नाही, असे जाहीरपणे रणबीरने कबूल केल्यानंतर तर कतरिनाबरोबरच्या नात्याविषयी इंडस्ट्रीत अधिकच चर्चा सुरू झाली. मात्र, दीपिका असू दे नाहीतर कतरिना यांच्यामुळे रणबीर आपल्या कारकिर्दीपासून भटकतो आहे, अशी तक्रार नीतू क पूरने केली असून कोणत्याच मुलीने त्याच्या जवळपास भटकू नये, अशी तंबीच तिने दिली आहे.  पण सध्या क तरिना आणि रणबीरच्या प्रेमाच्या गोष्टी अधिकच रंगू लागल्या आहेत. कतरिना मुंबईत असेल तर दोघांचेही एकमेकांना रोजच्या रोज भेटणे सुरू असते, ही गोष्ट आता प्रसिध्दीमाध्यमांपासून लपून राहिलेली नाही. सध्या ऋषी आणि नीतू कपूर ‘बेशरम’ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी दिल्लीमध्ये आहेत. याच चित्रपटाचे रणबीरच्या चित्रिकरणाचे शेडय़ूल संपवून तो मुंबईत परतला आहे. आणि कतरिनाही आयपीएलच्या कार्यक्रमाच्या तालमीसाठी मुंबईत असल्याने दोघेही रणबीरच्या कृष्णकुंज बंगल्यात दररोज भेटतात. रणबीरची गाडी कतरिनाच्या घराखाली नाहीतर कतरिनाची गाडी रणबीरच्या घराखाली.. या साऱ्या गोष्टींची प्रसिध्दीमाध्यमांमध्ये असलेली कुजबूज तिकडे दिल्लीत नीतू कपूपर्यंत पोहोचली आहे. एकीकडे दीपिका आणि रणबीरच्या नात्यात दरार पडण्यासाठीही आईचा हाच हेका कारणीभूत झाल्याचे बोलले जाते. कतरिनाबरोबर तिचे संबंध अजूनही चांगले आहेत. किंबहुना, स्क्रीनच्या पुरस्कार सोहळ्यासाठी नृत्याच्या तालमी करताना मनातली भीती दूर करण्याचे फंडेही तिला कतरिनाने शिकवले. असे सगळे असले तरी आपल्या मुलाने प्रेमात पडून कारकीर्द बिघडून घेऊ नये, असे नीतू कपूरचे ठाम मत असल्याने रणबीरला मुलींपासून दूर कसे ठेवायचे हीच मोठी चिंता तिला सतावते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 1:05 am

Web Title: nitu kapoor dosent want any girlfriend for her son ranbir
टॅग : Bollywood,Ranbir Kapoor
Next Stories
1 ढोबळेगिरी पडद्यावर
2 मेलबर्न चित्रपट महोत्सवात होणार अमिताभ बच्चनचा सन्मान
3 आजवरच्या कारकिर्दीत ‘बॉस’ सर्वात कठीण – अक्षय कुमार
Just Now!
X