News Flash

Alia Bhatt : आलिया नाही तर चित्रपट नाही..

आलिया भट्ट हिच्या यशाचा आलेख आता दिवसेंदिवस उंचावत आहे.

आलिया भट्ट

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या यशाचा आलेख आता दिवसेंदिवस उंचावत आहे. यामुळे बॉलीवूडमधील तिचे मानधन वाढण्यात उपयोग झालाच पण त्याचसोबत ती आता एक दमदार अभिनेत्री म्हणूनही वर येत आहे. तिच्या स्टार पॉवरचे नुकतेच एक उदाहरण समोर आले. अनविता दत्ता ही नीरज पांडेच्या निर्मिती संस्थेअंतर्गत दिग्दर्शक म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. फ्रायडे फिल्मवर्क्स ही नीरज पांडे आणि त्याची व्यावसायिक भागीदार शीतल भाटिया यांची नर्मिती संस्था आहे. यात रिलायन्स एन्टरटेमेंन्टचाही वाटा आहे. ही निर्मिती संस्था लवकरच एक चित्रपट काढणार आहे.

सदर चित्रपटाची कथा तयार असून यातील मुख्य भूमिकेकरिता नीरजच्या डोक्यात केवळ आलिया भट्टचे नाव आहे. या युवा अभिनेत्रीला लक्षात घेऊनच चित्रपटाची कथा लिहण्यात आली होती. कथा पूर्ण होताच ती आलियाकडे पाठविण्यात आली. पण, आलियाने सदर चित्रपट करण्यास नीरज आणि निर्मिती संस्थेला नकार कळविला. त्यामुळे आता नीरज पेचात पडला असून त्याला चित्रपटाकरिता दुसरी कोणतीच अभिनेत्री योग्य वाटत नाहीये. यानंतर नीरजने अनविताला एका नव्या विषयावर सुरुवात करून दुसरा चित्रपट बनविण्यास सांगितले आहे. आलियाच्या नकारामुळे चित्रपटावर किती मोठा परिणाम झाला आहे हे तिला माहित नाही.

दरम्यान, ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलीसाठी म्हणजेच अभिनेत्री आलिया भट्टसाठी यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार फार खास होता असे म्हणायला हवे. ६२ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये अभिनेत्री आलिया भट्टला ‘उडता पंजाब’ या चित्रपटात तिने केलेल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आलियाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर सोशल मीडिया आणि सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या सर्वांमध्ये सर्वात जास्त आनंदात आणि उत्साहात होते ते म्हणजे आलियाचे वडिल महेश भट्ट. आलियाला हा पुरस्कार मिळाल्यानंतर लगेच दुस-या दिवशीच्या सकाळी महेश भट्ट यांनी चेहऱ्यावर स्मित असलेल्या, शांतपणे झोपी गेलेल्या आलियाचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. ज्यामध्ये त्यांनी आलियाची प्रशंसा करणारे आणि तिला प्रोत्साहित करणारे असे कॅप्शनही लिहिले होते. आलियाला उद्देशून त्यांनी लिहिले होते की, ‘एकदा का तू निडर झालीस की आयुष्यात कोणत्याही गोष्टीसाठी सीमा राहात नाहीत. माझ्या महान पण तितक्याच मोठ्या मुलीचे खूप खूप अभिनंदन.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 6:35 pm

Web Title: no alia no film neeraj pandey tells director anvita dutt
Next Stories
1 ऋषी-रणबीरचा ‘प्रेम ग्रंथ’
2 ओम पुरींच्या आठवणींनी नसिरुद्दीन शाह गहिवरले
3 मी एक कलाकार आहे, नेता नाही- शाहरुख खान
Just Now!
X