जिलेट रेझरची जी जाहिरात दीपिका पदुकोण करीत आहे त्याला रेकिट बेनकिसर कंपनीने घेतलेली हरकत दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही जाहिरात थांबवण्यात यावी कारण त्यामुळे केस काढण्याच्या क्रीम विक्रीवर परिणाम होत आहे, असा दावा बेनकिसर कंपनीने केला होता.
न्या. बदर डय़ुरेझ अहमद व संजीव सचदेव यांनी प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजिन अँड हेल्थ केअर लि. व जिलेट इंडिया लि. कंपनीला नोटीस जारी केली आहे. न्यायाधीशांनी ही जाहिरात बंद करण्यावर अंतरिम आदेश देण्यास नकार दिला होता, त्यावर रेकिटने दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर या नोटिसा देण्यात आल्या. आता या प्रकरणाची सुनावणी २० नोव्हेंबरला होणार आहे. ३ नोव्हेंबरला एका न्यायाधीशांनी रेकिटच्या याचिकेनुसार जिलेटच्या जाहिरातीवर बंदीस नकार दिला होता व १९ नोव्हेंबरला सुनावणी ठेवली होती.