अभिनेता सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना ड्रग्ज सेवन प्रकरण समोर आले. त्याची अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे चौकशी सुरु आहे. या चौकशी दरम्यान दीपिका पदूकोण, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, नम्रता शिरोडकर, श्रद्धा कपूर ही नावे समोर आली. दरम्यान अभिनेत्री रवीना टंडनने ड्रग्जशी संबंधीत केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय कोणत्याही ड्रग्जचा पुरवठा होऊ शकत नाही. या प्रकरणातील मोठ्या लोकांना कोणीही प्रश्न विचारणार नाही. जर एक पत्रकार शोध घेऊन पुरवठा करणाऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. मग अधिकारी त्यांना शोधून का काढत नाहीत?. सेलिब्रिटींना सॉफ्ट टारगेट केले जाते’ या आशयाचे ट्विट रवीवाने केले आहे. तिचे हे ट्विट सध्या सध्या चर्चेत आहे.

आणखी वाचा : “चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी कोणत्याही अभिनेत्यासोबत…”, रवीनाचा खुलासा

रवीनाने आणखी एक ट्विट केले आहे. ड्रग्ज पुरवठा करणारे शाळा, कॉलेज, पब, रेस्टॉरन्टच्या बाहेर उभे असतात. हे सर्व थांबवले पाहिजे या आशयाचे दुसरे ट्विट रवीनाने केले आहे.

आणखी वाचा : ‘माल है क्या?’ असे विचारलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची अ‍ॅडमिन होती दीपिका?

यापूर्वीही रवीनाने ड्रग्ज संबंधी ट्विट केले होते. ‘साफ सफाई करण्याची वेळ आली आहे. स्वागत आहे! आपल्या येणाऱ्या पिढीची मदत करा. इथून सुरुवात करुया मग दुसऱ्या क्षेत्राकडे वळूया. इथून मुळापासून काढून टाकूया. दोषी, यूजर्स, डीलर्स, सप्लायर्स यांना शिक्षा मिळायला हवी. फायदा घेणारे लोकं निशाण्यावर आहेत’ या आशयाचे ट्विट रविनाने केले होते. दरम्यान रवीनाने ट्विटमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नव्हता.