19 September 2020

News Flash

लग्नाआधी मी ७५ मुलींना डेट केलंय- अंगद

'नो फिल्टर नेहा' या चॅट शोमध्ये अंगदने हजेरी लावली आणि आपल्या नात्याविषयी त्याने बऱ्याच गोष्टी या शोमध्ये सांगितल्या.

अंगद बेदी, नेहा धुपिया

सेलिब्रिटींचं लग्न म्हटलं की बरेच दिवस आधी त्याच्या तयारीची, पाहुण्यांच्या यादीची, विविध कार्यक्रमांची चर्चा रंगण्यास सुरुवात होते. मात्र अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांच्या लग्नाविषयी असं काहीच झालं नाही. नेहा आणि अंगदने एका खासगी कार्यक्रमात लग्नगाठ बांधली. या दोघांची प्रेमकहाणी फारशी चर्चेतही नव्हती. त्यामुळे यांच्या लग्नाची बातमी अनेकांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेली. लग्नाच्या काही महिन्यांतच नेहा गरोदर असल्याचंही समोर आलं. आता तिच्या ‘नो फिल्टर नेहा’ या चॅट शोमध्ये पती अंगदने हजेरी लावली आणि या दोघांच्या नात्याविषयी त्याने बऱ्याच गोष्टी या शोमध्ये सांगितल्या.

या शोमध्ये नेहाने अंगदला त्याच्या गर्लफ्रेंड्सविषयी प्रश्न विचारला. यावर अंगदने सांगितलं, ‘मी एका गर्लफ्रेंडसोबत फार काळ एकत्र राहू शकलो नाही. जवळपास ७५ मुलींना मी डेट केलं असेन. सुरुवातीला मी खूप मितभाषी होतो. पण दिल्लीहून मुंबईला आल्यानंतर गोष्टी बदलत गेल्या. नवीन मित्रमैत्रिणी होऊ लागल्या आणि माझ्यात बदल झाल्याचं मला स्वत:लाच जाणवू लागलं होतं.’

नेहा गरोदर असल्यामुळेच तिने अंगदशी घाईने लग्न केल्याची चर्चा होती. याविषयीदेखील अंगदने शोमध्ये खुलासा केला. लग्नापूर्वीच नेहा गरोदर होती, असं त्याने सांगितलं. ‘नेहा लग्नाआधी गर्भवती होती, त्यामुळे ही गोष्ट कुटुंबीयांना कशी सांगायची हा प्रश्न आम्हा दोघांनाही पडला होता. कुटुंबीयांना सांगण्याची हिंमतच होत नव्हती. मात्र पहिल्यांदा जेव्हा गोष्ट त्यांना सांगितली तेव्हा खूप ओरडा पडला. त्यांना ही गोष्ट पचवणं खूपच अवघड गेली, मात्र नंतर दोन्ही परिवारानं आमचं नातं मान्य केलं,’ असं तो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 5:12 pm

Web Title: no filter neha angad bedi dated 75 women before marrying neha dhupia
Next Stories
1 टी-सिरीजचा विक्रम! ठरला जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा यूट्युब चॅनेल
2 ‘बधाई हो’ पाहिल्यानंतर बिग बींने लिहिले नीना गुप्ता यांना पत्र
3 ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ स्पर्धक जिज्ञासा लवकरच प्रभू देवासोबत करणार काम
Just Now!
X