भारताला अनेक निसर्गरम्य स्थळांचे वरदान लाभले असल्याने प्रेक्षणीय स्थळांच्या शोधात परदेशात जाण्याची गरज नसल्याचे अभिनेत्री आणि निर्माती दिया मिर्झाचे मानणे आहे. खरं सांगायचे म्हणजे जेव्हा आम्ही भारतात चित्रीकरण अथवा कार्यक्रम करतो, तेव्हा मला खूप आनंद होतो. आपल्या देशात अनेक सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. भव्यदिव्य कार्यक्रम सादर करण्यासाठी परदेशात जाण्याची गरज असल्याचे मला वाटत नाही. भारतातसुद्धा तुम्हाला तसाच भव्यदिव्य कार्यक्रम सादर करता येऊ शकतो, परदेशात आणि भारतात कार्यक्रम सादर करण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना दिया बोलत होती. इव्हेन्ट अॅण्ड एंटरटेंन्मेंट असोसिएशनच्या ‘इइएमएएक्स’ पुरस्काराच्या परीक्षक मंडळाची दिया सदस्य आहे. देशातील विविध प्रांतातून मनोरंजन क्षेत्रातील विविध कंपन्यांनी नोंदविलेला सहभाग लक्षवेधी आहे. आपणदेखील मनोरंजन क्षेत्राचा भाग असून आम्ही कलाकार कशा ना कशा प्रकारे या क्षेत्राशीदेखील जोडले गेले असल्याचे ती म्हणाली. झपाट्याने वाढत असलेले हे क्षेत्र देशाच्या तिजोरीतील खजान्यात वाढ होण्यास बहुमुल्य योगदान देत असल्याचे सांगत, थाटामाटात लग्न आणि धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची भारतीयांना आवड असल्याचे तिने सांगितले. इन्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी लोकांच्या आयुष्यात आनंद भरत असल्याने अशा प्रकारच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन गरजेचे असल्याचे मत तिने व्यक्ते केले.