22 January 2020

News Flash

लारा दत्ताचा ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेतला ‘हा’ रेकॉर्ड १८ वर्षांनंतरही मोडणं अशक्य

२००० साली लारानं मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला होता. त्यानंतर ही स्पर्धा कोणत्याही भारतीय सौंदर्यवतीनं जिंकली नाही.

लारा दत्ता

बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘मिस युनिव्हर्स’ लारा दत्ता हिनं अठरावर्षांपूर्वी ‘मिस युनिव्हर्स’हा किताब जिंकला. याच सौंदर्य स्पर्धेत प्रियांका चोप्रानं ‘मिस वर्ल्ड’ तर दिया मिर्झानं ‘मिस एशिया पॅसिफिक’ हा किताब पटकावून नवा विक्रम रचला. मात्र या स्पर्धेत लारा दत्तानं रचलेला विक्रम १८ वर्षांनंतरही एकाही सौंदर्यवतीला मोडता आला नाही.

सौंदर्यस्पर्धेतील विविध फेरीत सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम लारा दत्तानं रचला आहे. तिनं ९.९९ असे सर्वाधिक गुण परीक्षकांकडून मिळवले होते. स्विमसुट फेरीत आणि अंतिम फेरीत तिनं सर्वाधिक गुण मिळवत मिस युनिव्हर्स स्पर्धेत नवा इतिहास रचला.  १८ वर्षे उलटली तरी हा रेकॉर्ड कोणत्याही सौंदर्यवतीला मोडता आला नाही. २००० मध्ये तिनं ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर एकाही भारतीय सौंदर्यवतीला मिस युनिव्हर्सचा किताब जिंकता आला नाही.

First Published on September 11, 2018 4:20 pm

Web Title: no one has broke lara dutta record that created in miss universe
Next Stories
1 आर्ची-परशासह नागराज मंजुळे झाले ‘सैराट’, ‘मनचिसे’त प्रवेश
2 ‘आमदार निवास’मध्ये थिरकणार सनी
3 ‘या’ अभिनेत्रीच्या नकारामुळे ऐश्वर्याच्या पदरात पडला उमराव जान
Just Now!
X