News Flash

‘मुंगडा’ रिमेक वादावर दिग्दर्शकांचं सडेतोड उत्तर

गाण्याचा रिमेक केल्यानंतर लता मंगेशकर यांनीही नाराजी व्यक्त केली होती

इंद्र कुमार

‘धमाल’ फ्रँचाइजीमधील तिसरा चित्रपट ‘टोटल धमाल’ प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील तगडी स्टारकास्ट मंडळी झळकणार आहे. त्यामुळे साऱ्यांनाच या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असल्याचं दिसून येतं. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘पैसा पैसा’ हे गाणं प्रदर्शित झालं. त्यानंतर मुंगडा हे गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं. हे गाणं१९७७ साली आलेल्या ‘इन्कार’ चित्रपटातील मुंगडा गाण्याचं रिक्रियेटेड व्हर्जन असून हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी त्याच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर चित्रपटाचे दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी उत्तर दिलं आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या जुन्या गाजलेल्या गाण्यांचं रिक्रियेटेड व्हर्जन करण्याचा ट्रेंड आला आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये जुन्या गाण्यांचे रिक्रियेटेड व्हर्जन पाहायला मिळालं. त्यानंतर टोटल धमाल या आगामी चित्रपटातही ‘मुंगडा’ गाण्याचं रिक्रियेटेड व्हर्जन तयार करण्यात आलं. हे गाणं ऐकल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र यावर इंद्र कुमार यांनी सडेतोड उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.

‘९० च्या दशकात माझ्याही एका चित्रपटातील गाणं असंच रिक्रियेट करण्यात आलं होतं.तेव्हा माझीदेखील कोणीच परवानगी घेतली नव्हती. आणि विशेष म्हणजे गाण्यांचं रिक्रियेट करताना म्युझिक कंपनीची परवानगी घ्यावी लागते. याविषयीचे सारे अधिकारी म्युझिक कंपनीकडे असतात’, असं इंद्र कुमार यांनी सांगितलं.

पुढे ते असंही म्हणाले, ‘१९९७ साली मी दिग्दर्शित केलेल्या ‘इश्क’ चित्रपटातील ‘नींद चुराई मेरी…’ हे रोहित शेट्टी याच्या ‘गोलमाल रिटर्न्स’मध्ये वापरण्यात आलं होतं. तेव्हा माझी परवानगी घेतली गेली नव्हती. मुळात गाण्याचे सर्व अधिकार म्युझिक कंपनीकडं असल्यामुळे त्या गाण्याचं काय करायचं ते कंपनीच ठरवू शकते’.

दरम्यान, ‘मुंगडा’चं रिक्रियेट ऐकल्यानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीदेखील नाराजी व्यक्त करत आतापर्यंत आमच्या अनेक गाण्यांचं रिक्रियेट करण्यात आलं, मात्र आमची साधी परवानगीही घेण्यात आली नाही, असं त्या म्हणाल्या. त्यांच्याप्रमाणेच ‘मुंगडा’ या मूळ गाण्याचे संगीतकार राजेश रोशन व गायिका उषा मंगेशकर यांनी आक्षेप घेतला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2019 5:01 pm

Web Title: no one took my permission while recreating my film songs says indra kumar on row over mungda song
Next Stories
1 Video : मादाम तुसाँच्या परदेशी संग्रहालयामध्ये ‘देसीगर्ल’चा जलवा
2 कंगनाच खरी रॉकस्टार – अनुपम खेर
3 हॅण्डसम टायगरला हिरोइन मिळेना
Just Now!
X