19 September 2020

News Flash

तमन्ना म्हणते बॉलीवूडला प्राधान्य नाही..

तमन्ना म्हणजेच तमन्ना भाटिया आठवली का? नाहीच आठवणार.

| June 23, 2015 06:28 am

तमन्ना म्हणजेच तमन्ना भाटिया आठवली का? नाहीच आठवणार. आधी ‘हिम्मतवाला’ आणि नंतर ‘हमशकल्स’ या सपशेल आपटलेल्या चित्रपटांची नायिका म्हणजे तमन्ना. भाटिया हे तिचे आडनाव असले तरी तामिळ आणि तेलुगू फॉम्र्युलाबाज चित्रपटांची नायिका म्हणून तमन्ना गाजली होती. त्यामुळे बॉलीवूडमध्येही आपले नशीब आजमावून पाहू या म्हणूनच तिने बॉलीवूडमध्ये दोन चित्रपट केले. परंतु, तिची चित्रपटांची निवड चुकली. ते चित्रपट सपशेल आपटले. म्हणून आता तमन्ना म्हणतेय की बॉलीवूडला प्राधान्य देणार नाही.
बॉलीवूडचे चित्रपट आणि दाक्षिणात्य चित्रपट या दोन्ही चित्रपटांमध्ये सर्वसाधारणपणे मुळातच नायिकेला अनेकदा काही काम नसते. अर्थात हिंदी सिनेमात याला अपवाद खूप आहेत हे कंगना राणावत, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, विद्या बालन यांनी सिद्ध केले आहे. तरीसुद्धा या नंबर वन अभिनेत्री सोडल्या तर स्टार अभिनेते जे नायकाच्या भूमिकेत झळकतात त्यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर पडद्यावर दर्शन देणाऱ्या दुय्यम दर्जाच्या अभिनेत्रींना बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर माफक यश किंवा सपशेल अपयश मिळते हे अधोरेखित झाले आहे. त्यातच तेलुगू आणि तामिळ चित्रपट हे पठडीबाज, फॉम्र्युलाबाज चित्रपट असतात. त्यामुळे अशा चित्रपटांत गाजलेल्या तमन्नासारख्या अभिनेत्रींना बॉलीवूडपटांमध्ये दुय्यम स्थानच मिळते. त्यामुळे बॉलीवूडला आता प्राधान्य देणार नाही म्हणणाऱ्या तमन्नाला मुळातच तिचे दोन हिंदी चित्रपट सडकून आपटल्यानंतर बॉलीवूडच्या निर्मात्यांनीच प्राधान्य दिले नसावे हे स्पष्टच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2015 6:28 am

Web Title: no priority to bollywood tamanna
टॅग Humshakals
Next Stories
1 मोहन जोशी ‘स्वामी समर्थ’!
2 मनातल्या उन्हातचा अनिल कपूरने केला फर्स्ट लूक लॉन्च
3 पावसाळ्यात चित्रीकरण.. थोडी मजा, बरीचशी सजा
Just Now!
X