News Flash

‘प्रिती झिंटाने पाच अटी लादल्याचे वृत्त असत्य’

माजी प्रियकर आणि व्यावसायिक भागीदार नेस वाडियाविरुद्ध जून महिन्यात पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने पाच अटी...

| September 5, 2014 07:41 am

‘प्रिती झिंटाने पाच अटी लादल्याचे वृत्त असत्य’

माजी प्रियकर आणि व्यावसायिक भागीदार नेस वाडियाविरुद्ध जून महिन्यात पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने पाच अटी घातल्याच्या वृत्तात सत्यता नसल्याचे वाडिया समूहाच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले. मरिन ड्राईव्ह पोलीस स्थानकात दाखल केलेल्या लेखी तक्रारीत ३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर आयपीएल सामन्यादरम्यान नेस वाडियाने आपल्याशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचे अभिनेत्री प्रितीने म्हटले होते. अटीच्याबदल्यात तक्रार मागे घेण्याची चर्चा दोन्ही पक्षात झालेली नसल्याचे सांगत, या केवळ अफवा असून, त्यात काही तथ्य नसल्याचे वाडिया समूहाचा प्रवक्ता म्हणाला. दरम्यान, नेस वाडियातर्फे या प्रकरणी बोलाविण्यात आलेल्या नवीन चार साक्षीदारांनी त्या दिवशी दोघांमध्ये सर्व काही नेहमीप्रमाणेच होते असे सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2014 7:41 am

Web Title: no truth in preity zintas five conditions story ness wadias spokesperson
Next Stories
1 शिक्षक दिनानिमित्त बॉलिवूडकरांनी मानले शिक्षकांचे आभार!
2 प्रादेशिक भाषांत हॉरर चित्रपट बनवण्यासाठी तीन मोठय़ा बॅनर्सची हातमिळवणी
3 प्रियांकानी घेतली राष्ट्रपतींची भेट
Just Now!
X